माजी पाकिस्तानी खेळाडू सईद अजमल यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंवर खूप टीका केल्या आहेत. त्यांनी क्रिकेट बोर्डाकडून रिजवान आणि बाबर सोबत होणाऱ्या व्यवहाराबद्दल काळजीपोटी प्रश्न विचारले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, ज्या प्रकारे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांच्यासोबत चुकीचा व्यवहार करत आहे, ही गोष्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी चांगली नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंड विरुद्ध टी20 स्क्वाडची घोषणा केली होती यामध्ये रिजवान आणि बाबर यांचं नाव सामील नव्हतं.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा यजमान असणाऱ्या पाकिस्तान संघाने स्पर्धेमध्ये अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली. न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर पराभूत होणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला. यानंतर पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी बाबर आजम, मोहम्मद रिजवान यांच्यावर खूप सडेतोड टीका केल्या. त्या खेळाडूंना प्रतिउत्तर करताना सईद अजमल यांनी वक्तव्य केल आहे की, आपल्या देशाच्या माजी खेळाडूंनी त्यांचं तोंड बंद ठेवावं. जर तुम्ही त्यांना कमी लेखता तर तुमचं क्रिकेट कसं पुढे जाईल हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे.
सईद अजमल पुढे म्हणाले, क्रिकेटमधील खराब पराभव हा आयुष्याचा अनुभव आहे, हे बाकीच्या माजी खेळाडूंना समजणे खूप गरजेचे आहे. तुम्ही सचिन तेंडुलकर असला तरीही तुम्ही प्रत्येक सामन्यामध्ये शतक नाही झळकावू शकत.
चॅम्पियन्स ट्रॉफी मधील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिजवानला टी20 कर्णधार पदावरून हटवले आणि बाबर आजम याच्यासोबत न्युझीलँड दौऱ्यावरून त्यालाही बाहेर केले. यावर अजमलने प्रश्न उपस्थित केला, ज्या प्रकारे तुम्ही त्या दोघांना बाहेर केले आहे ते चुकीचेच आहे. त्यांनी फक्त धावा केल्या नाहीत असं नाही, बाकीच्या खेळाडूंनी सुद्धा धावा केल्या नाहीत. निवडकर्त्यांनी बाबर आजम सोबत बसून चर्चा करायला हवी होती. ज्यामुळे त्याने आत्मविश्वासाने पुन्हा मैदानात पाय ठेवला असता.
अजमलने बाबर आजम आणि मोहम्मद रिजवानला महान खेळाडू म्हणत पुढे म्हणले की, त्यांचे आकडे कोणत्याही खेळाडूपेक्षा कमी नाहीत. फक्त ते आक्रमक फलंदाजी करीत नाहीत, पण ते धावा नक्कीच करतात.
त्यांनी विराट कोहलीचे उदाहरण देत म्हटले की, जर तो सामना विनर आहे तर आक्रमकतेची गरजच नाही. विराट कोहली सारखे दिग्गज फलंदाज सुद्धा त्यांच्या पारीला मोठ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आधी हळूहळू सुरुवात करतात आणि मग पुढे जातात. हीच त्यांच्या फलंदाजीची शैली आहे.
त्यांनी पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना सुद्धा ऐकवले. ते म्हणाले, जर पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंसोबत असा व्यवहार होत असेल, तर मग पाकिस्तानच्या बाकीच्या खेळाडूंचे काय होईल? एखाद्या वेळेस निराशा जनक कामगिरी झाली म्हणून असा व्यवहार करणे कितपत योग्य आहे.