आशिया चषकाचा आगामी हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. आशिया चषकासाठी जेव्हा पाकिस्तानचा संघ घोषित झाला, तेव्हा भारतासाठी हे कडवे आव्हान मानले जात होते. पण परिस्थिती आता काही अंशी बदलली आहे. कारण आहे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी. शाहीन आफ्रिदीला आशिया चषकासाठी पाकिस्तानच्या संघात सामील केले गेले होते, परंतु दुखापतीमुळे शनिवारी (२० ऑगस्ट) त्याला आशिया चषकातून माघार घ्यावी लागली.
माध्यमांतील वृत्तानुसार शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याला झालेली दुखापत गंभीर आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला ४ ते ६ आठवड्यांचा वेळ लागू शकतो, असेही सांगितले गेले आहे. दुखापतीमुळे तो आशिया चषकासोबतच इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेतून देखील बाहेर झाला आहे. पीसीबीने देखील याविषयी माहिती दिली आहे. तरी ऑक्टोबर महिन्यात शाहीन मैदानात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान संघा न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. तसेच आगामी टी-२० विश्वचषकात देखील शाहीन महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी उपस्थित असेल.
मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात आफ्रिदीने जबरदस्त प्रदर्शन केले आणि भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती. अशात यावर्षी खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकापूर्वी तो बाहेर पडल्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी ही बाब भारतीय फलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार, असे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषकातील अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. उभय संघातील हा सामना २८ ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
पाकिस्तानने मागच्या महिन्यात श्रीलंका दौरा केला होता. गॉल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. असे असले तरी, श्रीलंका दौऱ्यानंतर शाहीनने संघासोबत नेदरलंड दौरा केला होता. आता आशिया चषकातून बाहेर झाल्यानंतर संघ त्याच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे. सोशल मीडियावर मोहम्मद आमिरला संधी मिळावी, असी माहिती होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एशिया कप: टीम इंडियाकडून झाली मोठी चूक! ‘या’ मॅच विनरला संघात न घेण्याचा निर्णय येईल अंगलट
भारताच्या तिकडीला टोमणा मारणाऱ्या वकार युनिसला चाहत्यांनी दाखवला आरसा! सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
‘आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू मॅच विनर’, आशिया चषकातून बाहेर झालेल्या आफ्रिदीचा सूचक इशारा






