भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंमध्ये होणारे वाद आपल्या सर्वांना माहिती आहे. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावरही खेळाडू एकमेकांविरुद्ध भिडलेले आपण पाहिले आहे. काही प्रकरणे तर मैदानात घडत असतात. परंतु मैदानाबाहेर गेल्यानंतर खेळाडू पुन्हा चांगले मित्र बनतात. असे अनेक खेळाडू आहेत जे विरोधी संघाच्या खेळाडूंना आदराने पुकारतात.
अशाच प्रकारे पाकिस्तानचा माजी फिरकीपटू गोलंदाज साकलेन मुश्ताकने (Saqlain Mushtaq) भारतीय संघाचा माजी फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंंबळे (Anil Kumble) आपल्याला मोठ्या भावासारखा असल्याचे सांगितले आहे.
सकलेनने १९९५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत पाऊल ठेवले. त्याने जवळपास २००४पर्यंत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले. साकलेनने ४९ कसोटी सामने आणि १४९ वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २०८ आणि वनडेत २८८ विकेट्स घेतल्या आहेत.
कुंबळेबद्दल बोलताना साकलेन म्हणाला की, एक सामन्यात सकलेन बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डोळ्यांना त्रास होत होता. त्याला चेंडू व्यवस्थित दिसत नव्हता. त्यामुळे त्याने कुंबळेला आपली समस्या सांगितली आणि त्याला विचारले की, जर चांगल्या डॉक्टरांचे नाव वगैरे माहिती असेल तर मला सांग. यावर कुंबळेने त्याला एका डॉक्टरांचा सल्ला दिला. त्यावेळी त्याने डॉक्टरांची भेट घेतली आणि त्याला त्याचा बराच फायदा झाला.
याव्यतिरिक्त साकलेनला जेव्हाही कोणत्या मदतीची आवश्यकता असते. त्यावेळी कुंबळे त्याच्या मदतीला तयार असायचा. यावेळी सकलेन म्हणाला की, “आमचे संस्कार आम्हाला मोठ्या व्यक्तींचा आदर करायला सांगतात. मी कुंबळेला आपला मोठा भाऊ मानतो.”
कुंबळेची गणना जगातील सर्वात सभ्य व्यक्तींमध्ये केली जाते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचा गोलंदाज मुनाफ पटेलला दुखापत झाली होती. त्यावेळी कुंबळे त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
-क्रिकेटपटूंनो, मोबाईल पासून दूर रहा नाहीतर…
-सर जडेजाची टिंगल करणं इंग्लंडच्या खेळाडूला पडलं महाग, जडेजाने दिले खतरनाक उत्तर