भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या जल्लोष करण्याच्या पद्धतीसाठी क्रिकेट जगतात ओळखला जातो. धवनला अनेकदा शतक केल्यावर किंवा झेल घेतल्यावर स्वतःच्या मांडीवर थाप मारताना पाहिले गेले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू साजिद खान (Sajid khan) यालाही अलिकडच्या काळात धवनप्रमाणे जल्लोष करताना पाहिले गेले आहे. साजिदने स्वतः यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
मांडीवर थाप देणे, हा प्रकार शक्यतो कुस्ती किंवा कबड्डीमध्ये पाहिला जातो. परंतु, धवनने ही पद्धत क्रिकेटच्या मैदानात आणली. त्याला अनेकदा असे करताना पाहिले गेले आहे. असे असले तरी, पाकिस्तानचा साजिद खानही याच प्रकारे जल्लोष करताना दिसू लागला आहे. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी १६ सदस्यांच्या पाकिस्तान संघाची घोषणा केली गेली. साजिद खानही या संघात सहभागी आहे.
साजिदने खुलासा केला की, धवनसारखा जल्लोष केल्यामुळे त्याल प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन वेळा दंड ठोठावला गेला होता. धवन जरी मोठ्या काळापासून त्याच्या मांडीवर थाप मारत आला असला, तर साजिद मात्र अलिकडेच असे करताना दिसून आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना साजिद म्हणाला की, ‘प्रत्येकाची स्वतःची स्टाइल असते आणि लोक म्हणतात की, मी धवनच्या जल्लोषाचे अनुकरण केले. मी अशाप्रकारचा जल्लोष शाळेत असल्यापासून करत आलो आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा जल्लोष केल्यामुळे मला दोन वेळा दंड ठोठावला गेला होता. आता प्रत्येकजण या जल्लोषाचे कौतुक करत आहे.’
दरम्यान, साजिद खानने मागच्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत ४ कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत. मागच्या वर्षा बांगलादेशविरुद्धच्या एका सामन्यातील दोन्ही डावांमध्ये त्याने १२ विकेट्स घेतल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक शतक देखील आहे.
महत्वाच्या बातम्या –
साहाच्या आरोपांनंतर समोर आली द्रविडची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी जराही दुःखी नाही कारण…’
रोहित ठरला विराट-धोनीला भारी; भारतात केली कोणालाही न जमलेली कामगिरी
भारताविरुद्धच्या पराभवाचे पोलार्डने सांगितले कारण, म्हणाला, ‘आम्ही भारताच्या डावाच्या…’





