भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षीच्या अखेरीस झालेल्या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो जवळपास 6 महिने क्रिकेट खेळला नाहीये. असे असले, तरीही त्याने त्याच्या फलंदाजीमुळे जगभरात नाव कमावले आहे. पंतच्या फलंदाजी शैलीचे जगभरातील दिग्गज कौतुक करतात. अशात पाकिस्तान संघाचा युवा खेळाडू मोहम्मद हॅरिस यानेही पंतविषयी भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, त्याला पंतसारखे तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये खेळायचे आहे.
पाकिस्तानचा युवा खेळाडू मोहम्मद हॅरिस (Mohammad Haris) याची ओळख सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील खेळाडू म्हणूनच आहे. उजव्या हाताने फलंदाजी करण्याव्यतिरिक्त हॅरिस गोलंदाजी आणि यष्टीरक्षणातही माहीर आहे. त्याने आतापर्यंत पाकिस्तानकडून 5 वनडे आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. हॅरिसला त्याची ओळख फक्त मर्यादित षटकांचा क्रिकेटपटू म्हणून ठेवायची नाहीये. त्याला पाकिस्तानकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळायचे आहे. त्यासाठी तो क्रीझवर धैर्याने फलंदाजी करण्याचे धडे घेत आहे.
माध्यमांशी बोलताना 22 वर्षीय हॅरिस म्हणाला की, “मला फलंदाज म्हणून अधिक धैर्य राखण्याची गरज आहे. मी यासाठी कठोर मेहनत घेत आहे. मी चौकार-षटकार मारू शकतो, पण मला एकेरी आणि दुहेरी धावही माझ्या खेळात सामील करायची आहे. त्यासाठी मी ग्राऊंड शॉट सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.”
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळण्याची इच्छा व्यक्त करत त्याने रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांचे उदाहरण दिले. तो म्हणाला की, “मी फक्त टी20 क्रिकेट प्रकारातील फलंदाज म्हणून राहू इच्छित नाही. मला पाकिस्तानसाठी तिन्ही प्रकारात खेळायचे आहे. मी वेगाने फलंदाजी करतो, याचा अर्थ असा नाही की, मी फक्त टी20साठीच योग्य आहे. रिषभ पंत आणि गिलख्रिस्ट यांसारख्या खेळाडूंनी याच गतीने फलंदाजी करत खेळाच्या सर्व प्रकारात यश मिळवले आहे.”
हॅरिसची कारकीर्द
हॅरिसने पाकिस्तानकडून 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 14च्या सरासरीने आणि 127च्या स्ट्राईक रेटने 126 धावा केल्या आहेत. 5 वनडे सामन्यातील चार डावात त्याच्या नावावर 27 धावांची नोंद आहे. (pakistans wicketkeeper batsman mohammad haris on Rishabh Pant Style said this read)
महत्वाच्या बातम्या-
ICC Rules : वनडे अन् टी20मधील पॉवरप्ले, कधी झाले बदल आणि काय होता बॅटिंग Powerplay नियम? वाचा
नाद नाद नादच! IPL Final गाजवणारा पठ्ठ्या TNPLमध्ये करतोय राडा, कुणीच रोखणार नाही टीम इंडियातील एन्ट्री?






