आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आज (26 जानेवारी) वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार युवा विस्फोटक फलंदाज सॅम अयुब (Saim Ayub) स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
सॅम अयुब (Saim Ayub) सध्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) प्रमुख मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) म्हणाले की, सॅम अयुब या स्पर्धेत पाकिस्तान संघाचा भाग असणार नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohin Naqvi) यांनी युवा सलामीवीर सॅम अयुबला घोट्याच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून वगळले आहे. तो लंडनमध्ये उपचार घेत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याचा घोटा फ्रॅक्चर झाला होता.
नक्वी यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी दररोज त्याच्या डॉक्टरांशी बोलत आहे आणि येत्या काही दिवसांत त्याच्या घोट्यावरील प्लास्टर काढून टाकले जाईल. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागेल आणि आम्ही फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची भविष्यातील कारकीर्द धोक्यात घालणार नाही.” तो आमच्यासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि आम्हाला त्याला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवायचे आहे, कितीही वेळ लागला तरी. मी वैयक्तिकरित्या त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवत आहे.”
सॅम अयुबच्या (Saim Ayub) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने पाकिस्तानसाठी 8 कसोटी, 9 वनडे आणि 27 टी20 सामने खेळले आहेत. 8 कसोटीत त्याने पाकिस्तानसाठी 14 डावात फलंदाजी करताना 26च्या सरासरीने 364 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 77 आहे. 9 वनडे सामन्यात त्याने 64.37च्या सरासरीने 515 धावा केल्या आहेत. वनडेत त्याने 1 अर्धशतकासह 3 शतके झळकावली आहेत. 27 टी20 सामन्यात त्याने 498 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 1 अर्धशतक देखील झळकावले आहे. टी20 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 98 आहे.
अधिक वाचा-
जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार का? पाहा लेटेस्ट अपडेट!
गौतम गंभीर-केएल राहुलपासून ते मोहम्मद शमीपर्यंत, भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
‘भारताच्या विजयाचं संपूर्ण श्रेय….’, इंग्लंडच्या कर्णधारानं तिलक वर्माची पाठ थोपटली!