---Advertisement---

VIDEO: ‘ते 17 वर्षांनंतर आले तर त्यांना रिकाम्या…’ पाकिस्तान हरल्यावर हे काय बोलून गेले पीसीबी अध्यक्ष

On: सोमवार, ऑक्टोबर 3, 2022 5:24 PM
England Cricket Team
---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvENG) यांच्यात सात सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. पाकिस्तान यजमान असलेल्या या मालिकेत पाहुण्या संघाने बाजी मारली. इंग्लंडने ही मालिका 4-3 अशी जिंकली. या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (2 ऑक्टोबर) खेळला गेला. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने 67 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी केलेले विधान चांगलेच व्हायरल झाले आहे.

रमिझ राजा (Ramiz Raja) यांनी पीसीबीचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून, लोकांना आवडो किंवा न आवडो, ते नेहमीच काहीना काही विधाने करत असतात. त्यांचे पत्रकार परिषदेमधील सडेतोड उत्तर आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यात सरळपणा यामुळे ते वारंवार चर्चेत राहतात. यातच त्यांनी इंग्लंड जिंकल्यावर प्रेझेटेशन सेरेमनीमध्ये असे काही म्हटले ज्यावरून सगळेच त्यांची खिल्ली उडवत आहे. त्यांनी म्हटले, “इंग्लंड 17 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आला आहे. अशात त्यांना आम्ही का नाही जिंकू देणार?” हे त्यांनी मस्करीत म्हटले होते.

इंग्लंड संघाने 17 वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा केला आहे. यामध्ये त्यांनी पहिल्याच टी20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होता. या मालिकेतील पहिले चार सामने कराची येथे खेळले गेले. तर उर्वरित सामने लाहोरमध्ये खेळले गेले. तेव्हा मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली. लाहोर येथे झालेला पाचवा सामना पाकिस्तानने जिंकत मालिकेत 3-2 अशी आघाडी घेतली होती, तर इंग्लंडने सहावा सामना 8 विकेट्सने जिंकत पुन्हा एकदा मालिका बरोबरीत आणली. त्यामुळे शेवटचा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्वाचे होते.

PCB Chairman Ramiz Raja Interview | Pakistan vs England | 7th T20I 2022 | PCB | MU2T

मालिकेतील सातव्या सामन्यात इंग्लंडने मोईन अली याच्या नेतृत्वाखाली खेळताना 3 विकेट्स गमावत 209 धावांचा डोंगर रचला. यामध्ये डेविड मलान याने नाबाद 78 धावांची खेळी केली. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी देखील उत्तम कामगिरी केली. ख्रिस वोक्स याने 3 आणि डेविड विले याने 2 विकेट्स घेतल्या. यावेळी पाकिस्तानचा कर्णधारा बाबर आझम आणि विकेटकीपर मोहम्मद रिझवान हे दोन्ही सलामीवीर अनुक्रमे 4 आणि 1 धावा करत बाद झाले. शान मसूद याने अर्धशतकी खेळी केली असली तरी पाकिस्तानने हा सामना गमावला आणि मालिकाही गमावली.

यावर्षी पाकिस्तानने घरच्या मैदानावर दोन मालिका गमावल्या आहेत. आधी ऑस्ट्रेलियाने कसोटी आणि आता इंग्लंडने टी20 मालिकेत पाकिस्तानला पराभूत केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला आशिया चषक: सलग दुसऱ्या विजयासह टीम इंडिया टॉपवर; मेघना-शफालीची वादळी फलंदाजी
T20WC: बुमराहबद्दल ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मोठे भाष्य! म्हणाला, ‘भारताला जिंकण्यासाठी त्याचे संघात…’
टेन्शन वाढलं! हर्षल-अक्षर आणि अर्शदीपला मिळून चोपल्या गेल्या 160 धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---