बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने जबरदस्त फलंदाजी बरोबरच चांगले क्षेत्ररक्षण करून गाजवला.
या सामन्यात हार्दिकने फलंदाजाला धावबाद करण्याच्या प्रयत्नात चक्क स्टंपचेच दोन तुकडे केले. झाले असे की हार्दिक अफगाणिस्तानच्या दुसऱ्या डावाच्या 15 व्या षटकात गोलंदाजी करत होता.
त्यावेळी अफगाणिस्तानचा हशमतुल्लाह शाहिदी आणि कर्णधाक असघर स्टॅनिकझाई फलंदाजी करत होते. हार्दिकने टाकलेल्या या षटकाच्या शेवटच्या चेंडूला शाहिदीने सरळ टोलावले. हा चेंडू लगेचच हार्दिकने पकडत चेंडू वेगात स्टंपच्या दिशेने फेकला.
वेगात आलेला चेंडू थेट आॅफ स्टंपवर आदळला. ज्यामुळे आॅफ स्टंपचे दोन तुकडे झाले. मात्र शाहिदी क्रिजमधे लगेच परतल्याने बाद झाला नाही.
हा सर्व प्रकार बघुन मात्र हार्दिकला हासू आवरता आले नाही. त्याने याआधी याच सामन्यात अफगाणिस्तानच्या पहिल्या डावात मोहम्मद शेहजादला धावबाद केले होते.
तसेच हार्दिकने या सामन्यात फलंदाजी करताना त्याचे अर्धशतकही पूर्ण केले होते. हे त्याचे कसोटीतील तिसरे अर्धशतक आहे. त्याने 94 चेंडूत 10 चौकारांसह 71 धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीही असाच काहिसा प्रकार अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यात झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात पहायला मिळाला होता. त्यावेळी अफगाणिस्तानच्या शापूर झारदाने टाकलेला या वेगवान चेंडू बांग्लादेशचा फलंदाज रुबेल हुसेनला मारता न आल्याने चेंडू सरळ लेग स्टंपला लागला आणि त्या स्टंपचे दोन तुकडे झाले होते.
New Stump Please! Hardik Pandya Broke the Stumps.#INDvAFG #AFGvINDhttps://t.co/KGAlichpgf
— Sports Mirror India (@sportsmirror9) June 15, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–पराभवामुळे लगेच अफगानिस्तान संघाला दोष देऊ शकत नाही- अजिंक्य रहाणे
–ऐकावे ते नवलच! ११६ वर्षांनंतर भारतीय संघाने केला असा कारनामा
–सर जडेजांचा मोठा पराक्रम, आजपर्यंत केवळ एका भारतीयाने केला आहे हा भीमपराक्रम