भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या विश्वचषक 2023 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला असून यानंतर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आता विश्वचषकातील एकही सामना तो खेळू शकणार नाही, पण तो संघाला बाहेरून पाठिंबा देत राहील, हे सत्य पचवणे फार कठीण असल्याचे हार्दिक पंड्याने सांगितले.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला दुखापत झाली होती. हार्दिक पहिले षटक टाकत असताना फलंदाजाने मारलेला चेंडू अडवताना त्याचा पाय घसरला आणि त्यामुळे त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर तो उपचारासाठी बेंगळुरू येथील एनसीएमध्ये गेला होता. तेव्हापासून हार्दिक पंड्या याच्याबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते.
यापूर्वी असे बोलले जात होते की, तो श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करेल. यानंतर त्याला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात संघात सामील होण्यास सांगण्यात आले. यानंतर आणखी एक अपडेट आला की तो उपांत्य फेरीपर्यंत तंदुरुस्त असेल पण आता तो स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर गेला आहे.
विश्वचषक 2023 मधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पंड्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यानी ट्विट करूत म्हटले की, “विश्वचषकातील उर्वरित सामने मी खेळू शकणार नाही, हे सत्य पचनी पडणे कठीण आहे. मात्र, मी संघासोबत राहीन आणि प्रत्येक सामन्यात प्रत्येक चेंडूवर त्यांचा जयजयकार करेन. सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेले प्रेम आणि पाठबळ प्रचंड आहे. हा संघ खूप खास आहे आणि मला विश्वास आहे की आमचा सर्वांना अभिमान वाटू शकतो.”
हार्दिक पंड्या विश्वचषकामधून बाहेर पडल्यानंतर प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याचा त्याच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा विश्वचषक 2023 मधील 8वा सामना कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे. भारताने या विश्वचषकात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत त्यातील सातही सामने भारताने जिंकले आहेत. 14 गुणांसह भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानी विराजमान आहे. (Pandya emotional post after exiting the World Cup saying he satya pachni)
म्हत्वाच्या बातम्या
AUSvENG: प्रतिष्ठेच्या सामन्यात इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही प्लेईंग इलेव्हन
पाकिस्तानवर भारी पडला रचिन! झळकावले विश्वचषकातील तिसरे शतक, 23 व्या वर्षीच…