भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (5 नोव्हेंबर) घमासान होणार आहे. विराट कोहली याचा 35वा वाढदिवस आणि हा सामना एकाच दिवशी आहे. हा विश्वचषक सामना कोलकाता स्थित ईडन गार्डन स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. विश्वचषक 2023 दरम्यान सामन्यांच्या तिकिट विक्रीबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याआधीही या तक्रारी कमी होण्याऐवजी वाढल्याचे दिसते.
विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाचा केवळ एक सामना कोलकातामध्ये आयोजित केला गेला आहे. हा सामना रविवारी (5 नोव्हेंबर) ईडन गार्डन स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल. या दोन्ही संघांनी विश्वचषक सुरू झाल्यापासून अप्रतिम प्रदर्शन केले असून गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर जागा मिळवली आहे. अशात रविवारचा सामना चांगलाच रोमांचक होऊ शकतो. कोलकात्यामध्ये क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये याचा अनेकदा प्रत्यय देखील आला आहे. मात्र, अनेक शहरात वर्षांनंतर होणाऱ्या विश्वचषक सामन्यासाठी चाहत्यांना तिकिटे मिळाले नाहीत.
बंगाल क्रिकेट असोसिएशन म्हणजेच कॅबच्या सदस्यांमध्येही तिकिट न मिळाल्यामुळे रोष पाहायला मिळत आङे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (3 नोव्हेंबर) ईडन गार्डनच्या बाहेर तिकिट न मिळालेल्या शकडो चाहत्यांनी आंदोलन केले. कॅबच्या सदस्यांना ईडन गार्डनवर होणाऱ्या सामन्यांची मोफत तिकिटे मिळतात. मात्र, भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान तिकिटांची मागणी प्रचंड असल्यामुळे कॅब सदस्यांपैकी काहींना तिकिटे मिळाली नाहीत. आंदोलन करणाऱ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी, महिला आणि मुलांचा समावेश होता. आंदोलकांपैकी काहीजण दोन दिवसांपासून स्टेडियमबाहेर तिकिटासाठी लाईन लावून उभे आहेत. मात्र, तरीही त्यांना तिकिट मिळाले नाहीये. तर काहींच्या मते ऑनलाईन देखील तिकिट उपलब्ध झाले नाहीत. अशात माजी दिग्गज सौरव गांगुली यांचे भाऊ आणि कॅबचे अध्यक्ष स्नेहाशीष गांगुली यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले.
स्नेहाशीष म्हणले की, “ऑनलाईन तिकिट विक्रीमध्ये आमची काहीच भूमिका नाही. ही जबाबदारी बुक माय शोच्या माध्यमातून बीसीसीआय पाहत आहे. आम्हाला जे तिकिट मिळाले, ते आम्ही वाटले. जो पहिल्यांदा आला, त्याला तिकिट मिळाले.” दरम्यान, स्नेहाशीष यांनी सांगितल्याप्रमाणे विश्वचषकादरम्यान तिकिट विक्रीची पूर्ण जबाबदारी बीसीसीआयने घेतली आहे. पण बोर्डाला ही जबाबादारी चांगल्या पद्धतीने पार पाडता आली नाही, असेच दिसते. यापूर्वी अनेक सामन्यांदरम्यान तिकिट विक्रीच्या समस्या चाहत्यांकडून. (It’s time for cab members to protest after not getting tickets for the India South Africa match)
महत्वाच्या बातम्या –
शमीच्या गोलंदाजीने स्टोक्स झाला प्रभावित, म्हणाला, ‘तो नक्कीच विश्वचषकाचा…’
“हा मूर्खपणा करून तुम्ही आमचीही लाज काढताय”, अक्रमने पाकिस्तानी दिग्गजाला चांगलंच झापलं