---Advertisement---

आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत पंकज सहानी, अजिंक्य वाडिया, मझहर ताहेरभॉय, अयान खान यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

On: सोमवार, नोव्हेंबर 21, 2022 10:48 PM
File Photo
---Advertisement---
पुणे, 21 नोव्हेंबर 2022 – रॉयल कॅनॉट बोट क्लब(आरसीबीसी) यांच्या वतीने व जितेश पतोडिया यांच्या संलग्नतेने आयोजित आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पंकज सहानी, अजिंक्य वाडिया, मझहर ताहेरभॉय, अयान खान  या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 
 
आरसीबीसीच्या स्नूकर हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अजिंक्य वाडिया याने जेनीत रामैय्याचा 2-0(75-68, 69-19) असा एकतर्फी पराभव केला. तर मझहर ताहेरभॉय याने मिनीश रामैय्या वर 2-0(103(36)-77, 114-83) असा विजय मिळवला. अन्य लढतीत पंकज सहानीने वेदांत दोशीला 2-1(54-67, 77-55, 76-72) असे पराभूत केले. अयान खान याने ईशान भालेला 2-1(80-63, 58-88, 90-57) असे नमवित आगेकूच केली. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 
पंकज सहानी वि.वि.वेदांत दोशी 2-1(54-67, 77-55, 76-72);
अजिंक्य वाडिया वि.वि.जेनीत रामैय्या 2-0(75-68, 69-19);
मझहर ताहेरभॉय वि.वि.मिनीश रामैय्या 2-0(103(36)-77, 114-83);
अयान खान वि.वि.ईशान भाले 2-1(80-63, 58-88, 90-57).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---