---Advertisement---

कुणी काहीही म्हणो, पंतने आपल्या खेळात बदल करायला नको!

On: मंगळवार, जुलै 21, 2020 7:52 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा खेळाडू सुरेश रैनाने यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची प्रशंसा केली आहे. त्याने म्हटले आहे की पंत एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि माझी अशी इच्छा आहे की त्याने आपला नैसर्गिक खेळ खेळावा. आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील लाईव्ह चॅटदरम्यान चर्चा करताना रैनाने असे म्हटले.

रैनाने म्हटले, पंत (Rishabh Pant) जसा आहे, त्याने तसेच राहावे. त्याने आपल्या क्षमतेनुसार फलंदाजी केली पाहिजे. यावर पंतने म्हटले, रैनाबरोबर प्रशिक्षण घेतल्यामुळे त्याला खूप काही शिकायला मिळाले.

पंत म्हणतो, रैनाने खेळाच्या बाबतीत खूप काही शिकवले

पंतने रैनाबद्दल बोलताना म्हटले, की त्याच्याबरोबर प्रशिक्षण घेण्याचा अनुभव चांगला होता. तो डावखुरा फलंदाज आहे. रैनाने मला खेळ आणि आयुष्याच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी शिकविल्या त्यामुळे माझ्या खेळात सुधारणा होत आहेत.

रैना आणि पंत गाझियाबादमध्ये प्रशिक्षण घेतले

मागील काही दिवसांपूर्वी रैनाने (Suresh Raina) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तो आणि पंत कोरोना व्हायरसच्या काळात गाझियाबाद येथे नेट्समध्ये एकत्र प्रशिक्षण घेत होते.

मागील एका वर्षात तिन्ही क्रिकेट प्रकारात पंतने केल्या आहेत ४६० धावा

मागील एका वर्षामध्ये तिन्ही क्रिकेट प्रकारात पंतला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने १२ महिन्यांमध्ये कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामने मिळून २४ सामन्यात २२ च्या सरासरीने ४६० धावा केल्या आहेत.

यामध्ये त्याने ४ कसोटीत ११८ धावा, ७ वनडेमध्ये १६५ धावा आणि १३ टी२०मध्ये १७७ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-इंग्लंडची कसोटी चॅम्पियनशिपच्या पाँइंट टेबलमध्ये मोठी झेप; जाणून घ्या किती आहेत गुण

-३० वेळा आठवण करुन देऊनही मुंबई क्रिकेट असो. पोलीसांचे पैसे काही देईना

-प्रेक्षकांचा आवडता ऑस्ट्रेलियन खेळाडू दारुमुळे संपला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---