मुंबई | विंडीजविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी रिषभ पंतला या संघात संधी देण्यात आली आहे.
जरी भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून धोनीची निवड करण्यात आली असली तरी रिषभ पंतला धोनीचा बॅकअप म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून धोनीला धावा काढण्यात अपयश आले आहे. मागील महिन्यात (सप्टेंबर) झालेल्या एशिया कपस्पर्धेत धोनीने 4 डावात 19.50 सरासरीने 77 धावा केल्या आहेत.
धोनी यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी बजावत आहे. तसेच सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहली असो किंवा रोहित शर्मा धोनीचे मार्गदर्शन घेताना दिसतात. धोनीचा फलंदाजीचा फाॅर्म हा खरा चिंतेचा विषय आहे.
2019 विश्वचषक स्पर्धेत धोनीसोबत आणखी एक पर्यायी यष्टीरक्षक खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी रिषभ पंतला विंडिजविरूद्धच्या पहिल्या दोन वन-डे साठी संघात स्थान देण्यात आले आहे.
रिषभ पंतने आतापर्यंत भारतीय संघाकडून 4 कसोटी आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत खेळलेल्या 7 डावात पंतने 36.29 च्या सरासरीने 254 धावा केल्या आहेत. 4 टी-20 सामन्यात त्याने 24.33 च्या सरासरीने 73 धावा केल्या आहेत.
पंतला धोनीसारखे अफलातून यष्टीरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर तो भारतीय संघात निवडला गेला आहे. यामुळे एकप्रकारे २०१९ विश्वचषकात धोनीने जर खराब कामगिरी केली तर पुढील सामन्यात संघव्यवस्थापन पंतलाच संधी देईल.
भारत आणि विंडिज यांच्यातील वन-डे मालिकेला 21 आॅक्टोबरपासून गुवाहटी येथे सुरुवात होणार आहे.
पहिल्या दोन वन-डे सामन्यांसाठी भारतीय संघ खालील प्रमाणे आहे-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, मनिष पांडे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रिषभ पंत, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दुल ठाकूर, केएल राहुल
महत्वाच्या बातम्या-
- पृथ्वी शाॅच्या अडचणी वाढल्या, विंडीजच्या गोलंदाजाने शोधली बाद करण्याची सुपर आयडीया
- प्रो कबड्डी: चढाईत ५०० गुण पूर्ण करणारा काशीलिंग अडके पाचवा खेळाडू, तर महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू
- #MeToo Movement: अर्जुना रणतुंगापाठोपाठ लसिथ मलिंगावरही झाले आरोप