मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून(२६ डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. ५० षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यादरम्यान अनेकदा भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतचे संवाद सातत्याने स्टंप माईकमधून ऐकू येत होते.
याचवेळी त्याने गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनला दिलेला एक सल्ला महत्त्वाचा ठरला. यामुळे भारताला बर्थडे बॉय मॅथ्यू वेडची महत्त्वाची विकेट मिळाली. त्यामुळे अनेकांना भारताचा माजी यष्टीरक्षक कर्णधार एमएस धोनीची आठवण झाली. धोनीही अनेकदा यष्टीमागून गोलंदाजांना मार्गदर्शन करायचा. तसेच त्यामुळे गोलंदाजांना मदत व्हायची.
यावेळी मॅथ्यू वेड १२ व्या षटकात फलंदाजी करत असताना त्याने चौथ्या चेंडूवर अश्विनला चौकार ठोकला. त्यावेळी पंत अश्विनला सांगत होता की ‘चेंडू आतच ठेव, हा नक्की मारेल’. विशेष म्हणजे झाले तसेच. पाचव्या चेंडूवर वेडने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि झेलबाद झाला. रविंद्र जडेजाने त्याचा शानदार झेल घेतला.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/HogiDHFM/status/1342642801679290368
https://twitter.com/Darling_Nani_45/status/1342688220719403009
Almost disaster! But Jadeja held his ground and held the catch! @hcltech | #AUSvIND pic.twitter.com/SUaRT7zQGx
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2020
वेडने ३० धावा केल्या. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्स आणि स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ शुन्यावर बाद झाले. मात्र नंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्यूशानेने शानदार अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सावरले. पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर हे दोघेही बाद झाले. हेड ३८ तर लॅब्यूशाने ४८ धावा करुन बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
स्मिथविरुद्ध कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमला नव्हता तो पराक्रम अश्विनने करुन दाखवला
गोल गिरकी घेत पुजाराने पकडला स्मिथचा अप्रतिम झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल