---Advertisement---

घटस्फोटानंतर पुन्हा चर्चेत युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा; ‘हा’ क्रिकेटपटू ठरला कारण

On: शनिवार, जुलै 26, 2025 6:56 AM
Yuzvendra Chahal and Dhanshree
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या त्याच्या खेळापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. अलिकडेच त्याने त्याची माजी पत्नी धनश्री वर्माशी घटस्फोट घेतला. पण त्यानंतरही ऋषभ पंतने चहलची खिल्ली उडवण्यापासून मागे हटले नाही. दोघेही अलीकडेच कपिल शर्माच्या शोमध्ये गेले होते. तिथे पंत आणि चहल यांच्यातील पडद्यामागील व्हिडिओमध्ये झालेल्या हलक्याफुलक्या संभाषणाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

अर्चना पूरन सिंग यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, युझवेंद्र चहल आणि गौतम गंभीर एकत्र दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक मजेदार क्षण आला, जेव्हा पंतने चहलच्या बोटात अंगठी घातली. त्यावर अर्चनाने हसत विचारले, “तुम्ही दोघं सगाई करताय का?” यावर पंतने मिश्कीलपणे उत्तर दिलं, “याची तर आधीच सगाई झालीय!” चहलही हसत म्हणाला, “जा पण झालीय.” दोघांचाही हसण्याचा हा क्षण नेटकऱ्यांना खूप भावला.

पुढे अर्चनाने चहलला मुंबईतील आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं, मात्र ती म्हणाली, “तू खूपच बिझी असतोस बहुतेक.” यावर पंतने हसतच उत्तर दिलं, “हा तर नेहमी इथेच असतो” चहलने थोडासा चिडून पंतला उद्देशून म्हटलं, “सगळ्यांना सांगच की आता” हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

दरम्यान, चहल आणि आरजे महवश यांच्या नात्याच्या चर्चा त्याच्या घटस्फोटापूर्वीपासून सुरू आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आणि आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये दोघांना एकत्र पाहण्यात आलं होतं. महवशने चहलच्या पंजाब संघाला मैदानात जाऊन पाठिंबाही दिला होता. मात्र, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत अधिकृत घोषणाही केलेली नाही.

सध्या चहल भारतीय संघाबाहेर असला तरी त्याचे खासगी आयुष्य आणि सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे तो कायम चर्चेत आहे. पंत आणि चहलमधील ही मजेशीर जुगलबंदी क्रिकेटप्रेमींना खूपच आवडत असून, चाहते त्यांच्या मैत्रीचं कौतुक करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---