टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा नुकताच संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. ही स्पर्धा संपल्यानंतर आता टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत देखील भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. रविवारी (२९ ऑगस्ट) पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरी क्लास ४ च्या सामन्यात भारताच्या भाविना पटेलने रौप्य पदक मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर तिच्या गावात जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
गुजरातच्या मेहसना जिल्यातील सुंधिया गावात तिच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि मित्र परिवारानी पारंपरिक गरबा नृत्य सादर केले. तसेच फटाके वाजवून आणि गुलाल उधळून या ऐतिहासिक कामगिरीनंतर जल्लोष साजरा केला. भाविनाला अंतिम सामन्यात, चायनाच्या झाउ यिंगने ०-३ ने पराभूत केले. तिला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी देखील ती पॅरालिम्पिक स्पर्धेत दीपा मलिकनंतर रौप्यपदक मिळवणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
Paralympian 🥈 Bhavina Patel's An incredible achievement for India on the #NationalSportsDay🎉 #Paralympics #ParaTableTennis #Tokyo2020 #Cheer4India #Praise4Para @narendramodi @ianuragthakur @IndiaSports @Media_SAI @ddsportschannel @TheLICForever @VedantaLimited @EurosportIN pic.twitter.com/5PVeOUYS13
— Paralympic India 🇮🇳 (@ParalympicIndia) August 29, 2021
झाउ यिंगने भाविनाला १९ मिनिटात ७-११,५-११ आणि ६-११ ने पराभूत केले. ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भाविनाचे वडील हंसमुख पटेल यांनी म्हटले की, “ती जरी अपंग असली तरी देखील आम्ही तिला त्या नजरेने पाहिलं नाही. आमच्यासाठी ती ‘दिव्य’ आहे. आम्हाला अभिमान आहे की, तिने देशासाठी रौप्यपदक जिंकले.”(Paralympic silver medalist bhaviniben Patel’s family friends celebrat her silver with garba)
#WATCH Family members and friends of Para-paddler Bhavina Patel in Mehsana perform 'garba' to celebrate her bringing home a Silver medal in her maiden Paralympic Games pic.twitter.com/h55CAAycOG
— ANI (@ANI) August 29, 2021
#WATCH Friends and family members of Indian Para table tennis player Bhavina Patel in Mehsana, Gujarat, celebrate her winning the silver medal at #TokyoParalympics
Bhavina Patel won a Silver medal after losing Women's singles class 4 final match pic.twitter.com/fnuR6jnxNu
— ANI (@ANI) August 29, 2021
हंसमुख पटेल यांनी आपल्या मुलीचा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी गावात मोठी स्क्रीन लावली होती. सकाळी बहुसंख्येने लोकांनी सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. भाविना जरी अंतिम सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरली असली तरीदेखील लोकांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पॅरालिम्पिकमध्ये भारताला दिवसातील तिसरे पदक, ४१ वर्षीय विनोद कुमारने जिंकले ‘कांस्य’