---Advertisement---

‘अरे हा थर्ड अंपायर आहे की, थर्ड क्लास अंपायरींग आहे..?’, विराटला बाद देण्याच्या निर्णयावरुन भडकले ‘बाबू भैया’

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात विवादास्पदरित्या बाद झाला. नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रसिद्ध सिने अभिनेते व माजी खासदार परेश रावल यांनी देखील यानंतर ट्विट करत संताप व्यक्त केला.

विवादास्पद पद्धतीने विराट झाला बाद
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील ३० वे षटक टाकण्यासाठी फिरकीपटू एजाज पटेल गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटचा चेंडू विराट कोहलीच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी गोलंदाज एजाज पटेल आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी पंचांकडे जोरदार अपील केले. पंचांनी देखील त्याला बाद घोषित केले. परंतु, कोहलीने क्षणही वाया न घालवता डीआरएसची मागणी केली. कारण, कोहलीला माहीत होते की, चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला लागून गेला आहे. मात्र, डीआरएस घेतले असता असे काहीच दिसून आले नाही आणि पंचांनी त्याला बाद घोषित केले.

परेश रावल यांनी केले ट्विट
कोहलीला बाद दिल्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय राहिला. अनेक चाहत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांचादेखील समावेश होता. त्यांनी ट्विट करत लिहिले,
‘हा थर्ड अंपायर आहे की थर्ड क्लास अंपायरिंग आहे?’
या व्यतिरिक्त आणखी काही चाहते ही या निर्णयामुळे व्यथित झालेले दिसून आले. अनेकांच्या मते विराट बाद नव्हता तर अनेकांनी त्याला बाद ठरवले.

पहिल्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत
पावसामुळे मुंबई कसोटीच्या पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मयंक अगरवाल व शुबमन गिल यांनी संघाला ८० धावांची सलामी दिली. शुबमन ४४ धावांवर बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहली खाते न खोलता बाद झाले. मात्र, मयंक याने दिवसाअखेर नाबाद राहत १२० धावा केल्या. भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ बाद २२१ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

https://mahasports.in/abu-dhabi-t10-league-adil-rashid-hattrick-delhi-bulls-beat-team-abu-dhabi/

https://mahasports.in/most-searched-indian-sports-personalities-of-2021-virat-kohli-ms-dhoni-neeraj-chopra-sachin-tendulkar/

https://mahasports.in/aakash-chopra-feels-rcb-will-break-the-bank-for-rahul-chahar-in-ipl-2022-mega-auction/

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---