---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 : हाॅकीमध्ये भारतानं दिली सलग दुसरी विजयी सलामी…!

On: मंगळवार, जुलै 30, 2024 7:30 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं मंगळवारी (30 जुलै) रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये भारतानं सलग दुसरा विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या (Harmanpreet Singh) नेतृत्वाखाली भारतानं सलग दुसरा विजय मिळवला आहे.

भारतीय हाॅकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतनं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 4 गोल केले आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक गोल करणारा तो पुरुष खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे हरमनप्रीतनं भारताच्या तिन्ही सामन्यांमध्ये गोल केले आहेत आणि तिन्ही सामन्यात त्यानं भारतासाठी पहिल्यांदा गोल केला आहे.

हाॅकीमध्ये ब गटात भारताशिवाय आयर्लंड, न्यूझीलंड, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियमचे संघ आहेत. आयर्लंडचा पराभव करुन भारतानं गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. 3 सामन्यांसह भारताचं गुणतालिकेत 7 गुण आहेत. गुणतालिकेत बेल्जियम दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे 6-6 गुण आहेत. अर्जेंटिना 1 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड आणि आयर्लंडचं खातं अद्याप उघडलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा, नेतृत्त्वपदी ‘या’ खेळाडूची वर्णी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागच्या जोडीचा शानदार विजय…!
श्रीलंकेत असूनही दुरावा, भारताच्या 6 खेळाडूंचा वेगळा सराव; कोच गंभीरच्या डोक्यात नेमकं काय आहे?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---