अमेरिकेचा धावपटू नोहा लायल्सनं इतिहास रचला आहे. त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. यासह त्यानं जगातील सर्वात वेगवान धावपटूचा किताब पटकावला आहे. जमैकाच्या किशाने थॉम्पसनला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं, तर अमेरिकेच्या फ्रेड केर्ले याला कांस्यपदक मिळालं.
पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स येथे 100 मीटर शर्यतीची अंतिम फेरी अतिशय रोमांचक झाली. नोहा लायल्सनं 9.784 सेकंदात शर्यत पूर्ण केली. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. तर थॉम्पसन 9.789 सेकंदांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. दोन धावपटूंमध्ये फक्त 0.005 सेकंदांचा फरक होता. अशाप्रकारे ही शर्यत ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात अतीतटीच्या शर्यतींपैकी एक ठरली. विशेष म्हणजे. 23 वर्षीय थॉम्पसन सध्या जगातील सर्वात वेगवान धावपटूंपैकी एक आहे.
पुरुष 100 मीटर अंतिम निकाल
सुवर्ण – नोहा लायल्स (अमेरिका) – 9.784 सेकंद
रौप्य – किशाने थॉम्पसन (जमैका) – 9.789 सेकंद
कांस्य – फ्रेड केर्ली (अमेरिका) – 9.810 सेकंद
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता इटलीचा जेकब्स मार्सेल पाचव्या स्थानावर राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या अकाने सिम्बाइनचे रिओ आणि टोकियो या दोन्ही स्पर्धेत पदकपासून थोडक्यात चुकला होता. पॅरिसमध्ये तो पुन्हा एकदा चौथ्या स्थानी राहिला.
2004 मध्ये जस्टिन गॅटलिननंतर 100 मीटरमध्ये अमेरिकेसाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नोहा लायल्स हा पहिला धावपटू आहे. 27 वर्षीय लायल्सनं संथ सुरुवात करूनही शानदार पुनरागमन करत ही शर्यत जिंकली. लायल्स आता पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत देखील सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार आहे. हा सामनाही अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
लायल्सनं गतवर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जमैकाच्या उसैन बोल्टचा 200 मीटर मधील 19.19 सेकंदांचा जागतिक विक्रम मोडण्याचं खुलं आव्हान दिलं होतं. परंतु तो हा विक्रम मोडू शकला नाही. त्यानं बुडापेस्ट झालेल्या स्पर्धेत 19.52 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकलं होतं.
हेही वाचा –
महाराष्ट्राचा अविनाश साबळे ॲक्शनमध्ये, लक्ष्य सेन कांस्यपदकासाठी लढेल; ऑलिम्पिकमधील भारताचं आजचं वेळापत्रक
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : पदकाचं स्वप्न भंगलं, बाॅक्सर लोव्हलिनाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॉक्सरसोबत चीटिंग झाली? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह