---Advertisement---

हँडबॉलपटूने हॉकी खेळाडूला सर्वांसमोर केले ‘फिल्मी स्टाईल प्रपोज’, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, जुलै 27, 2024 7:15 PM
paris olympic proposal
---Advertisement---

Paris Olympic 2024 :- जागतिक खेळांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या ऑलिंपिक खेळांना 26 जुलैपासून सुरुवात झाली आहे. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे हे खेळ 27 जुलै ते 11 ऑगस्ट यादरम्यान ही स्पर्धा खेळली जातील. स्पर्धेचा एक आगळावेगळा उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी पार पडला. खास नदीवर झालेल्या या सोहळ्यानंतर, घडलेली एक घटना आता चांगलीच चर्चेत आली आहे.

पॅरिसच्या सीन नदीवर सहभागी झालेल्या 205 देशांची परेड पार पडली. तर, आधुनिक ऑलिंपिकच्या इतिहासात प्रथमच मुख्य स्टेडियमपासून दूर ही परेड व उद्घाटन सोहळा आयोजित केला गेला होता. त्याला जगभरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तसेच, जवळपास तीन लाख लोकांनी समक्ष हा संपूर्ण सोहळा पाहिला. मात्र, त्यानंतर अर्जेंटिनाच्या दोन खेळाडूंची सर्वाधिक चर्चा होत आहे.

या स्पर्धेसाठी तयार केलेल्या ऑलिंपिक व्हिलेजमध्ये जवळपास दहा हजार पेक्षा जास्त खेळाडू दाखल झाले आहेत. अर्जेंटिना संघाचा हँडबॉलपटू पाब्लो सिमोनेट याने आपल्या देशाची महिला हॉकी खेळाडू मारिया कॅपॉय हिला प्रपोज केले. हँडबॉल व हॉकी संघाचे फोटोशूट सुरू असताना पाब्लो याने मारियाला प्रपोज करताच, ती आश्चर्यचकित झाली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवून दोघांचे कौतुक केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय.

पॅरिसच्या सीन नदीवर झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला क्रीडाप्रेमींनी फारशी पसंती दर्शवली नाही. अनेकांनी हा सोहळा अत्यंत रटाळ झाल्याचे म्हटले. तर, यादरम्यान अनेक गैरसोयींचा सामना करावा लागल्याचे खेळाडूंनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चीनने दोन सुवर्णपदक जिंकत शानदार सुरुवात केली आहे. भारतीय खेळाडूनबाबत बोलायचे झाल्यास नेमबाज मनू भाकेर हिने 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात अंतिम फेरीला आठवण भारताला आनंदाची बातमी दिली.

हेही वाचा – 

“गंभीर भारतीय संघात फार काळ टिकणार नाही”, माजी भारतीय खेळाडूचा खळबळजनक दावा
हार्दिक-नताशाच्या नात्यात नवा ट्विस्ट! घटस्फोटानंतर ‘या’ गोष्टीवरुन सुरू झाला वाद?
“फक्त इंजिन बदललंय, डब्बे तेच आहेत”, ‘लीडर’ रोहितचं कर्णधार सूर्यकुमारकडून लै कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---