पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी बातमी आली आहे. शनिवारी झालेल्या बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं पहिल्या फेरीचा सामना जिंकला होता. मात्र आता त्याचा विजय अवैध ठरविण्यात आला आहे. कारण लक्ष्य सेननं ज्या खेळाडूला पराभूत केलं होतं, तो दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत आता लक्ष्यला एक सामना जास्त खेळावा लागणार आहे.
वास्तविक, शनिवारी भारताचा लक्ष्य सेन आणि ग्वाटेमालाचा केविन कॉर्डन यांच्यात बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीचा सामना झाला. सुमारे 42 मिनिटे चाललेल्या या सामन्यात लक्ष्य सेननं केविनचा 21-8, 22-20 असा पराभव केला. लक्ष्यनं पहिला गेम अवघ्या 14 मिनिटांत 21-8 असा जिंकून शानदार सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये केविननं संघर्ष केला. पण शेवटी लक्ष्यनं हा सेट 22-20 असा जिंकून सामना खिशात घातला.
मात्र आता हा सामना जिंकूनही लक्ष्य हारला आहे. वास्तविक, केविन कॉर्डन कोपऱ्याच्या दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्याचं सांगण्यात येत आहे. तो बाहेर पडल्यामुळे लक्ष्यचा विजय अवैध ठरवण्यात आला. या सामन्याचा निकाल ऑलिम्पिकमधून काढून टाकण्यात आला आहे. याचाच अर्थ लक्ष्यचा केविन कॉर्डनवरील विजय अवैध मानला जाईल.
लक्ष्यला ग्रुप स्टेजचा पुढील सामना बेल्जियमच्या ज्युलियन कारागीविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर तो इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध खेळेल. या गटात तीन सामने खेळणारा लक्ष्य हा एकमेव खेळाडू असेल. दुखापतीमुळे कॉर्डन बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडल्यानं लक्ष्य हा या गटातील एकमेव खेळाडू असेल, जो तीन सामने खेळेल. तर इतर दोन खेळाडू जोनाथन क्रिस्टी आणि ज्युलियन कॅराघी हे बाद फेरी गाठण्यासाठी फक्त दोनच सामने खेळतील. याचाच अर्थ लक्ष्यला पुढील फेरी गाठण्यासाठी इतर 2 खेळाडूंपेक्षा एक सामना जास्त खेळावा लागेल.
हेही वाचा –
मनू भाकरच्या कांस्यासह भारताची पदकतालिकेत एंट्री, आज मिळू शकतात आणखी 3 गोल्ड मेडल!
मनू भाकरचं स्वप्नवत यश; खुलासा करताना म्हणाली, “काल भगवद्गीतेतील तो प्रसंग वाचला अन् आज….”
शाब्बास मनू! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलं पहिलं मेडल; नेमबाजीत कांस्य पदकावर निशाणा