पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताची मोहीम संपली आहे. 76 किलो फ्री स्टाईल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत किर्गिस्तानची कुस्तीपटू अपारी काईजी पराभूत झाली. यासह भारताची रितिका हुडा पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. किरगिझस्तानची कुस्तीपटू फायनलमध्ये पोहोचली असती, तर रितिकाला रिपेचेजद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी होती.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं एकूण सहा पदकं जिंकली आहेत. यामध्ये 5 कांस्य आणि एका रौप्यपदकाचा समावेश आहे. भारतानं ॲथलेटिक्समध्ये रौप्यपदक जिंकलं, तर नेमबाजीत 3 कांस्यपदकं आणि कुस्ती व हॉकीमध्ये प्रत्येकी एक कांस्यपदक आलं. कुस्तीपटू विनेश फोगटच्या बाबतीत निर्णय भारताच्या बाजूनं आल्यास पदकांची संख्या सात होईल. विनेशच्या प्रकरणाचा निर्णय काहीही असो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आलं नाही हे आता स्पष्ट झालं आहे. सुवर्ण पदकाशिवाय भारताची मोहीम व्यर्थच मानली जाईल.
भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीत पहिलं पदक मिळालं. मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं. त्यानंतर मनू भाकरनच मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरं कांस्य मिळवलं. तिनं सरबज्योत सिंग सोबत ही कामगिरी केली. स्वप्नील कुसळेच्या रुपानं भारतानं पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरं कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर पुरुष हॉकी संघानं कांस्यपदक आणि भालाफेकपटू नीरज चोप्रानं रौप्यपदक पटकावले. शेवटी कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदक जिंकलं.
भारतानं टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये 7 सुवर्णपदकं जिंकली होती. ही ऑलिम्पिक इतिहासातील भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. अशा स्थितीत, यावेळी भारताची पदकतालिका दुहेरी अंकात पोहोचेल, अशी अपेक्षा होती. पण ते घडलं नाही. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आलं नाही आणि भारताची पदकांची संख्या 6 वरच अडकली.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 6 नव्हे तर 12 पदके मिळाली असती; जाणून घ्या कशी झाली चूक
Paris Olympics: यंदाच्या ऑलिम्पिक मोहीमेत भारताची इतक्या पदकांची कमाई; सर्वोत्तम कामगिरीत दुसऱ्या स्थानी
विनेश फोगटच्या अपात्रेबाबत मोठं अपडेट समोर, या दिवशी होणार अंतिम निर्णय