---Advertisement---

विनेश फोगटच्या अपात्रेबाबत मोठं अपडेट समोर, या दिवशी होणार अंतिम निर्णय

On: शनिवार, ऑगस्ट 10, 2024 10:37 PM
---Advertisement---

भारतीय कुस्तीपटू रौप्य पदक देण्याच्या याचिकेवर सीएएस (CAS) काय निर्णय देते याची प्रतीक्षा करत आहेत. सीएएसने (CAS) निर्णयाची तारीख 11 ऑगस्टपर्यंत वाढवल्यामुळे विनेश फोगटची प्रतीक्षा वाढली आहे. सीएएस क्रीडा लवादाच्या न्यायालयाने एक प्रेस विज्ञप्ति जारी केली आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की आता निर्णय 11 ऑगस्ट रोजी घोषित केला जाईल, म्हणजेच विनेशला आणखी 24 तास प्रतीक्षा करावी लागेल.

जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आता विनेश फोगटच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा निर्णय 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी येईल. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) विनेश फोगटला (Vinesh Phogat) 50 किलो गटातील महिला कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवले होते कारण तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरले होते. विनेश आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) या दोघांनाही त्यांचे वकील निवडण्याची संधी देण्यात आली होती.

विनेशने तिच्या अपात्रतेविरुद्ध (7 ऑगस्ट) रोजी अपील दाखल केले होते आणि गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ती स्वतः हजर होती. वरिष्ठ वकील हरीश साळवे विदुष्पत सिंघानिया यांनी भारतीय कुस्तीपटूच्या वतीने युक्तिवाद सादर केला होता, त्यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनेही (UWW) आपली बाजू मांडली आणि सुमारे एक तास सुनावणी चालल्याचे सांगण्यात आले.

हा निर्णय 10 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता जाहीर होणार होता, मात्र सध्या विनेश फोगट आणि भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा काही तासांनी वाढली आहे. सीएएस अंतिम निर्णय देईल आणि नंतर औपचारिकपणे निर्णयाचे निवेदन जारी करेल असे यापूर्वी नोंदवले गेले होते. तर आता 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी हा निर्णय होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हाॅकी पुणे लीग: क्रीडा प्रबोधिनीला दुहेरी जेतेपदाची संधी
‘या’ सहा खेळाडूंना संघात कायम ठेवू शकते चेन्नई सुपर किंग्ज
कोहली ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर कोच शास्त्री सतत भांडायचे; भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---