पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला आतापर्यंत दोन पदकं मिळाली आहेत. दोन्ही पदकं नेमबाजीत आले. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज सातत्यानं चांगली कामगिरी करत आहेत. प्रथम नेमबाज मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या सिंगल इव्हेंटमध्ये पहिलं पदक जिंकलं. त्यानंतर भारतासाठी दुसरं पदक 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघानं जिंकलं, ज्यात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचा समावेश होता. ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी भारताला दुसरं पदक मिळालं. आता आज (31 जुलै, बुधवार) पाचव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी पदकं येऊ शकतात का? हे या बातमीद्वारे जाणून घ्या.
आज भारताला एकही पदक मिळण्याची शक्यता नाही. याचं मुख्य कारण म्हणजे वेळापत्रकानुसार आज भारताचा पदकासाठीचा एकही सामना नाही. मात्र आज नेमबाजीत राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंग ही महिला जोडी भारताच्या पदकाच्या आशा वाढवू शकते. ही जोडी नेमबाजीच्या महिला ट्रॅप फायनलसाठी पात्र ठरली, तर भारताच्या पदक मिळविण्याच्या आशा वाढतील.
याशिवाय आज अनेक भारतीय खेळाडू ॲक्शनमध्ये करताना दिसणार आहेत. तिरंदाजी, बॅडमिंटन, रोइंग, बॉक्सिंग आदींमध्ये पीव्ही सिंधू, लव्हलिना बोरगोहेन आणि लक्ष्य सेन हे स्टार मैदानात उतरतील. चला तर मग, जाणून घेऊया ऑलिम्पिकमधील भारताचं आजचं वेळापत्रक.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज (31 जुलै) भारताचं वेळापत्रक
शूटिंग
पुरुष 50 मीटर रायफल 3 पोझिशन – ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसळे – दुपारी 12.30
महिला ट्रॅप पात्रता दिवस 2 – श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी – दुपारी 12:30 वा
तीरंदाजी
वुमन सिंगल राउंड ऑफ 64 – दीपिका कुमारी विरुद्ध रीना परनाट – दुपारी 3:56
मेन्स सिंगल राउंड ऑफ 64 – तरुणदीप राय विरुद्ध टॉम हॉल – रात्री 9:28
बॅडमिंटन
महिला एकेरी ग्रुप एम – पीव्ही सिंधू विरुद्ध क्रिस्टिन कुबा – दुपारी 12:50
पुरुष एकेरी ग्रुप एल – लक्ष्य सेन विरुद्ध जोनाथन क्रिस्टी – संध्याकाळी 6:20
पुरुष एकेरी ग्रुप के – एचएस प्रणॉय विरुद्ध एलई डक फॅट – रात्री 11:00.
घोडेस्वारी
ड्रेसेज वैयक्तिक गट स्टेज – अनुष अग्रवाल – दुपारी 1:58
रोइंग
पुरुष एकेरी स्कल्स उपांत्य फेरी C/D 1 – बलराज पनवार – दुपारी 1:24
बॉक्सिंग
महिला 75 किलो राउंड ऑफ 16 – लोव्हलिना बोर्गोहेन विरुद्ध सुनिवा हॉफस्टेड – दुपारी 3:50
पुरुष 71 किलो राउंड ऑफ 16 – निशांत देव विरुद्ध जोस गॅब्रिएल रॉड्रिग्ज टेनोरियो – दुपारी 12:18
टेबल टेनिस
महिला एकेरी राउंड ऑफ 32 – श्रीजा अकुला विरुद्ध जियान झेंग (SGP) – दुपारी 2:30
महिला एकेरी राउंड ऑफ 16 – मनिका बत्रा वि TBD – रात्री 8:30
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : हाॅकीमध्ये भारतानं दिली सलग दुसरी विजयी सलामी…!
30 देश, 715 दिवस, 22000 किमी सायकल प्रवास! नीरज चोप्राच्या जबरा फॅननं गाठलं पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागच्या जोडीचा शानदार विजय…!