Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहाव्या दिवशी भारताने तिसरे पदक जिंकले आहे. 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशनमध्ये मराठमोळ्या स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक जिंकले. कोल्हापूरच्या या नेमबाजाने आपल्या गावासह, महाराष्ट्रासह देशाचा नाव पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उंचावले. यानंतर आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी भारताला 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये तिसरे पदक मिळाले. स्वप्नील कुसळे याने भारताला पहिल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून दिले. भारताला 50 मीटर रायफल 3 पोझिशन या स्पर्धेत स्वप्निलने पहिल्यांदाच पदक मिळवून दिले आहे. या नेमबाजीच्या गेममध्ये नेमबाजास (झोपून , बसून आणि उभे राहून) तीन पोझिशन मधून शूटींग करावे लागते.
त्याने हे पदक मिळवून दिल्यानंतर तो कार्यरत असलेल्या रेल्वेकडून देखील त्याचे कौतुक करण्यात आले. स्वप्निल हा मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट कलेक्टर पदावर कार्यरत आहे. विशेष म्हणजे स्वप्निल ज्याला आपला आदर्श मानतो तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा देखील सुरुवातीच्या काळात तिकीट कलेक्टर म्हणूनच काम करत असेल.
स्वप्निलने हे यश मिळवल्यानंतर रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी म्हटले, “स्वप्निल ने जे काही केले आहे ती रेल्वेसाठी गर्वाची गोष्ट आहे. आम्ही त्याचा तो माघारी आल्यानंतर यथोचित सन्मान करू. त्याला लवकरच रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले जाईल. तसेच, त्याला ताबडतोब पदोन्नती देत अधिकारी बनवण्यात येईल.”
🇮🇳🥉 𝗧𝗿𝗶𝗽𝗹𝗲 𝗕𝗿𝗼𝗻𝘇𝗲 𝗳𝗼𝗿 𝗜𝗻𝗱𝗶𝗮, 𝘁𝗿𝗶𝗽𝗹𝗲 𝘁𝗵𝗲 𝗷𝗼𝘆!
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀 𝗢𝗹𝘆𝗺𝗽𝗶𝗰𝘀 𝟮𝟬𝟮𝟰!
📸 Pics belong to the respective owners… pic.twitter.com/mgy6wmLrLJ
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 1, 2024
स्वप्निल हा कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा रहिवासी आहे. त्याची आई तेथील सरपंच असून, वडील शिक्षक आहेत. स्वप्निल याने पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सराव केल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय नेमबाज बनला. यापूर्वी त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मश्री मिळवून देण्यासाठी खासदार मोहोळ मैदानात
सर्वोत्तम कर्णधार कोण रोहित की धोनी? भारताच्या दिग्गज खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य
कोल्हापूरकर स्वप्नील कुसाळेसाठी सतेज पाटलांनी पेटारा उघडला, जाहीर केलं मोठं बक्षीस