---Advertisement---

भारतासाठी हार्ट ब्रेक…मनू भाकरचं तिसरं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं

On: शनिवार, ऑगस्ट 3, 2024 2:27 PM
---Advertisement---

मनु भाकर आम्हाला तुझा अभिमान आहे… तू खूप जबरदस्त कामगिरी केलीस!! भारताची स्टार नेमबाज मनू भाकरचं 25 मीटर एअर पिस्तूल महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पदक हुकलं आहे. ती या स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिली. मनू भाकरला तिसरं पदक जिंकता आलं नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिनं यापूर्वी 2 पदकं जिंकली आहेत.

आज (3 ऑगस्ट) मनू भाकर महिलांच्या 25 मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीत खेळत होती. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता हा सामना झाला. आठ सिरीजनंतर मनू आणि हंगेरीच्या वेरोनिका मेजरचे समान गुण होते. त्यानंतर शूटआऊट झाला, ज्यामध्ये मनूला पराभवाला सामोरं जावं लागलं. अशाप्रकारे तिचं पदक थोडक्यात हुकलं.

अंतिम फेरीत एकूण 10 सिरीज शॉट्स मारले जाणार होते. एका सिरीजमध्ये एकूण पाच शॉट्स होते आणि तीन सिरीजनंतर एलिमिनेशन फेरी सुरू झाली. सात सिरीजनंतर मनू दुसऱ्या स्थानावर होती. पण यानंतर तिचे काही शॉट्स चुकले, ज्यामुळे ती खाली आली. तिनं 8 सिरीजमध्ये एकूण 28 अचूक शॉट्स मारले. पात्रता फेरीत मनू भाकर एकूण 590 गुण मिळवून दुसऱ्या स्थानी राहिली होती.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर तिनं सरबज्योत सिंगसोबत मिश्र सांघिक प्रकारातही कांस्यपदक जिंकलं. अशाप्रकारे एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे भारतीय नेमबाज 

(1) राज्यवर्धन सिंग राठोड, रौप्य पदक, अथेन्स (2004)
(2) अभिनव बिंद्रा, सुवर्ण पदक, बीजिंग ऑलिम्पिक (2008)
(3) गगन नारंग, कांस्य पदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
(4) विजय कुमार, रौप्य पदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
(5) मनू भाकर, कांस्य पदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
(6) मनु भाकर, सरबज्योत सिंग, कांस्य पदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
(7) स्वप्नील कुसाळे, कांस्य पदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)

हेही वाचा – 

भर ऑलिम्पिकमध्ये प्रेम व्यक्त, सुवर्णपदक विजेतीला सर्वांसमोर केलं प्रपोज; सुंदर VIDEO व्हायरल
चक दे इंडिया! तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया भारताकडून चारीमुंड्या चीत
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---