Nita Ambani Bhangda Video : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympic 2024) भारताने पहिले पदक जिंकून चांगली सुरुवात केली आहे. या मेगा स्पोर्ट्स टूर्नामेंटची सुरुवात 26 जुलै रोजी भारताच्या पॅव्हेलियनच्या उद्घाटनाने झाली. त्याचे नाव ‘इंडिया हाऊस’ असे आहे. रिलायन्स फाउंडेशनने इंडिया हाऊस सादर केले आहे. त्यामुळे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी दोघेही या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. त्याच दिवशीचा आणखी एक खास व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नीता अंबानी पाहुण्यांसोबत भांगडा करताना दिसत आहे.
नीता अंबानींनी केला भांगडा
इंस्टाग्रामरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक सुलबीरच्या ‘गल बन गई’ आणि ‘देवा श्री गणेशा देवा’ या प्रसिद्ध गाण्यांवर जबरदस्त भांगडा करताना दिसत आहेत. यावेळी नीता अंबानींना भारताचा जयजयकार करण्यासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांनी घेरले होते. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
View this post on Instagram
नीता अंबानी यांचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 वरील भाषण
नीता अंबानी ज्या क्रीडा प्रशासक आणि आयओसी सदस्य आहेत त्यांनी ला विलेट येथील इंडिया हाऊसच्या उद्घाटनावेळी पीटीआयशी संवाद साधला आणि आश्वासन दिले की भारत खूप चांगले काम करणार आहे. अंबानी म्हणाल्या, “आमच्या 47 टक्के खेळाडू मुली आहेत. हा सर्व आपल्या तरुण मुला-मुलींना स्त्री शक्तीचा धडा असू शकतो. इथे कोणीही कमी दर्जाचे नाही. फक्त प्रत्येकाने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.”
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनू भाकरचे वर्चस्व
दरम्यान नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. कारकिर्दीतील दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात मनूला यश आले आहे. यावेळी भारतातून एकूण 117 खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वीचा इंग्लंडमध्ये जबरदस्त ‘शो’, केवळ इतक्या चेंडूत फटकावल्या 76 धावा
पॅरिस ऑलिम्पिक: अर्जुन बबुताचा निशाना थोडक्यात चुकला..! एअर रायफलमध्ये गमावलं पदक
“गोलंदाजीच्या क्षमतेमुळे रियान परागला…” माजी भारतीय खेळाडूचा मोठा दावा