भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Sri Lanka) आहे. त्यामध्ये 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील 2 टी20 सामने खेळले गेले. या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवत विजय मिळवला. भारतानं 2 विजयासह ही टी20 मालिका आपल्या खिशात घातली. रविवारी (29 जुलै) झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतानं 7 विकेट्सनं विजय मिळवला. तत्पूर्वी भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणनं (Irfan Pathan) रियान परागबद्दल (Riyan Parag) मोठं वक्तव्य केलं आहे.
भारताचा पहिला टी20 सामना कोलंबो येथे खेळला गेला. या सामन्यात भारतानं 43 धावांनी विजय मिळवला होता. परंतू पहिल्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली नव्हती. युवा खेळाडू रियान परागला (Riyan Parag) संधी देण्यात आली होती. परागनं पहिल्या टी20 सामन्यात 3 बळी घेतले. भारताचा तिसरा टी20 सामना मंगळवार (30 जुलै) रोजी खेळला जाणार आहे.
तत्पूर्वी माजी भारतीय खेळाडू इरफान पठाणनं (Irfan Pathan) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यामध्ये रियान परागबद्दल (Riyan Parag) लिहलं की, “त्याच्या गोलंदाजीच्या क्षमतेमुळे रियान परागला (Riyan Parag) भविष्यात अनेक संधी मिळताना दिसतील. अशी चमकदार गोलंदाजी करणारे टॉप ऑर्डरचे फलंदाज तुम्हाला देशात आढळणार नाहीत. ही गोष्ट परागला खूप फायदा देते.”
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिस ऑलिम्पिकला गालबोट, कमेंट्रीदरम्यान समालोचकाची जीभ घसरली; चॅनलनं उचललं मोठं पाऊल
“2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रिकेटपटू जिंकणार सुवर्णपदक…” भारताच्या माजी प्रशिक्षकाचं मोठं वक्तव्य
…तर ‘थाला’ आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणार, लागू व्हायला पाहिजे हा खास नियम