बाॅर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थ कसोटी 295 धावांनी जिंकली. या सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक होत आहे.
त्यामुळे भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराचा असा विश्वास आहे की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहमध्ये चांगला कर्णधार होण्याचे सर्व गुण आहेत आणि रोहित शर्माने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताने कर्णधारपदासाठी दीर्घकालीन पर्याय म्हणून त्याचा विचार केला पाहिजे.
चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, “तो (दीर्घकालीन कर्णधारपदासाठी एक पर्याय) आहे यात शंका नाही. मायदेशात मालिका पराभवानंतर भारत ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी सामना खेळत असताना त्याने कठीण परिस्थितीत आपले नेतृत्व दाखवून दिले. मला विश्वास आहे की त्याच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि तो एक संघाचा माणूस आहे. तुम्ही त्याला पाहा. तो कधीही फक्त स्वतःबद्दल बोलत नाही, तो संघ आणि इतर खेळाडूंबद्दल बोलतो.”
भारताला घरच्या मालिकेत न्यूझीलंडकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता. ज्यामुळे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला. त्यावर पुजारा म्हणाला, “काही वेळा खेळाडूंना सल्ल्याची गरज नसते आणि ते त्याला स्वीकारतात. हे एका चांगल्या कर्णधाराचे लक्षण आहे. बुमराह ड्रेसिंग रूममधील खेळाडूंशी खूप मैत्रीपूर्ण आहे आणि मदत करण्यास उत्सुक आहे. तो बोलण्यासाठी चांगला माणूस आहे, क्रिकेटच्या बाहेरही तो सभ्य आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराह, माॅर्ने माॅर्केलमुळे सिराज बनला हीरो? म्हणाला, “मी जस्सी भाईशी…”
IPL 2025; लिलावात अनसोल्ड ठरलेल्या 3 स्टार खेळाडूंना मिळू शकते संधी! कसं ते जाणून घ्या
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (टाॅप-5)