पॅरिसमधील 33 व्या ऑलिम्पिक खेळांना शुक्रवारी (26 जुलै) शानदार सुरुवात झाली. यावेळी रंगतदार सादरीकरण आणि सीन नदीवर बोट परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटन समारंभात फ्रान्सनं आपली सांस्कृतिक विविधता आणि ऐतिहासिक वारसा जगासमोर मांडला. ऑलिम्पिक परेड यावेळी पारंपारिक स्टेडियम ऐवजी नदीवर आयोजित करण्यात आली होती. या 6 किलोमीटर लांब परेडमध्ये 205 देशांतील 6800 हून अधिक खेळाडू 85 बोटींवर स्वार झाले होते. याशिवाय निर्वासित ऑलिम्पिक संघानंही सहभाग घेतला.
भारतीय वेळेनुसार रात्री अकराच्या सुमारास हा सोहळा सुरू झाला. सुमारे 3 ते 4 तास हा सोहळा चालला. समारंभातील भारतीय तुकडीचं नेतृत्व दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिस दिग्गज शरथ कमल यांनी केलं. भारतीय संघ 84 व्या स्थानावर होता. महिला खेळाडूंनी राष्ट्रध्वजाच्या रंगातील साड्या परिधान केल्या होत्या, तर पुरुषांनी कुर्ता-पायजमा घातला होता. भारतीय संघात एकूण 78 खेळाडू आणि अधिकारी यांचा समावेश होता.
View this post on Instagram
यावेळी ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा कोणत्याही स्टेडियममध्ये न होता सीन नदीवर आयोजित करण्यात आला होता. येथे 205 देशांच्या खेळाडूंनी बोटीतून परेड केली. ऑलिम्पिकच्या इतिहासात हे प्रथमच घडलं आहे. उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी लाखो लोक आले होते. उद्घाटन सोहळ्यासाठी दोन लाखांहून अधिक मोफत तिकीटांचं वाटप करण्यात आलं होत. तर एक लाखाहून अधिक तिकिटांची विक्री झाली होती.
फ्रान्सचा दिग्गज फुटबॉलपटू झिनेदिन झिदान हा ऑलिम्पिक मशाल घेऊन पॅरिसच्या रस्त्यावरून धावल्यानंतर उद्घाटन समारंभाची सुरुवात झाली. शेवटी फ्रेंच पोल व्हॉल्टिंग लीजेंड रेनॉड लॅव्हिलेनी यांनी टेडी रिनर आणि मेरी-जोसी पेरेक यांना ऑलिम्पिक मशाल दिली. यासह ऑलिम्पिक 2024 ला सुरुवात झाली.
हेही वाचा –
पदकाचा दुष्काळ संपवण्यास खेळाडू सज्ज! पहिल्याच दिवशी या खेळातून खाते उघडण्याची अपेक्षा
देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या 5 खेळांमध्ये भारताचं पदक निश्चित! तिघांकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा