भारताची स्टार नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. यासह ती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. तिच्या या कामगिरीनंतर अनेकांचं लक्ष या खेळाकडे वळलं आहे. या खेळाचे नियम आणि अटी काय असतात? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो.
पिस्तूल स्पर्धांमध्ये खेळाडूंना कोणत्याही आधाराशिवाय एका हातानं लक्ष्य साधावं लागतं. शूटिंग रेंजवर पोहोचल्यानंतर मॅच सुरू होण्यापूर्वीपासून संपेपर्यंत रेंज ऑफिसरच्या आदेशांचं पालन करावं लागते. त्यांच्या आदेशाशिवाय तुम्ही तुमचं पिस्तूल बॉक्समधून बाहेर काढू शकत नाही किंवा ते पुन्हा बॉक्समध्ये ठेवू शकत नाही. याशिवाय, तुमचं पिस्तूल लोड केलेलं नाही आणि ते कोणाकडेही लक्ष्य केलेलं नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. पिस्तूलपासून दूर असताना बॅरलवर सुरक्षा ध्वज ठेवणं महत्त्वाचं आहे. पिस्तूल आणि रायफल या दोन्हींसाठी हे नियम ठरवण्यात आले आहेत.
10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वापरलेली पिस्तूल ही 4.5-मिलीमीटर कॅलिबरमध्ये सिंगल-लोडेड बंदूक असते. तर 25 मीटर स्पर्धेत वापरली जाणारी 5.6 कॅलिबर पिस्तूल ही पाच-शॉट मॅगझिन असलेली रॅपिड फायर पिस्तूल असते. पिस्तुल स्पर्धांमध्ये खेळाडूंना इनडोअर शूटिंग रेंजमध्ये स्थिर टार्गेटवर लक्ष्य ठेवावं लागतं. सर्व शूटिंग निर्धारित अंतरावरून – 10 मी, 25 मी, 50 मी केली जाते, ज्यामध्ये खेळाडूंना कागदापासून बनवलेल्या टार्गेटवर लक्ष्य करावं लागतं.
पिस्तूल स्पर्धेचे नियम 10 मीटर एअर रायफल सारखेच आहेत. यामध्ये पुरुष, महिला आणि मिश्र संघ सहभागी होतात. एकेरी गटात (पुरुष आणि महिला) नेमबाज एक तास आणि 15 मिनिटांच्या कालावधीत 60 शॉट्स घेतात. त्यानंतर अव्वल आठ नेमबाज पदक फेरीसाठी पात्र ठरतात. मिश्र सांघिक स्पर्धेत, प्रत्येक संघ सदस्य 40 शॉट्स मारतो आणि पाच सर्वोच्च स्कोअर करणारे संघ अंतिम फेरीत पोहचतात.
हेही वाचा –
मनू भाकर दुसऱ्या ऑलिम्पिक पदकापासून केवळ एक पाऊल दूर! आजच रचू शकते इतिहास
पॅरिस ऑलिम्पिक: अर्जुन बबुताचा निशाना थोडक्यात चुकला..! एअर रायफलमध्ये गमावलं पदक
मनू भाकरच्या कांस्यासह भारताची पदकतालिकेत एंट्री, आज मिळू शकतात आणखी 3 गोल्ड मेडल!