पॅरिस ऑलिम्पिकचा 12 वा दिवस भारतासाठी खूपच निराशाजनक ठरला. कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर संपूर्ण देशाचे हार्टब्रेक झाले. मात्र, आज (08 ऑगस्ट) या स्पर्धेच्या 13व्या दिवशी भारताला पदकाची आशा असेल. वास्तविक नीरज चोप्रा भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतो. याशिवाय भारतीय हॉकी संघ कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि स्पेन यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होईल. आज भारताच्या झोळीत किमान 2 पदकांची आशा आहे. या बातमीद्वारे आजच्या 13व्या दिवशीच्या भारतीय खेळाडूंच्या वेळापत्रकावर एक नजर टाकूयात..
गोल्फ
महिला : अदिती अशोक आणि दीक्षा डागर (दुसरी फेरी) – दुपारी 12.30 वाजता
ऍथलेटिक्स
महिलांची 100 मीटर हर्डल्स रिपेचेज फेरी: ज्योती याराजी – दुपारी 2.05 वाजता
पुरुष भालाफेक: (अंतिम सामना) नीरज चोप्रा- रात्री 11.55 वाजता
कुस्ती
पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो (उपांत्यपूर्व फेरी): अमन सेहरावत – दुपारी 2.30 वाजता
महिला फ्रीस्टाइल 57 किलो (उपांत्यपूर्व फेरी): अंशू मलिक – दुपारी 2.30 वाजता
हॉकी
पुरुष कांस्यपदक सामना: भारत विरुद्ध स्पेन: संध्याकाळी 5.30 वाजता
तत्पूर्वी, काल (07 ऑगस्ट) अर्चना कामथने महिला टेबल टेनिस सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आव्हान सादर केले होते, परंतु भारतीय संघाचा जर्मनीकडून 3-1असा पराभव झाला होता, त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय टेबल टेनिस संघाची मोहीम संपुष्टात आली होती. त्याचवेळी भारताची अनुभवी भालाफेकपटू अन्नू राणीने देखील पुन्हा निराशा केली.
मात्र, आज भारतीय चाहत्यांच्या नजरा नीरज चोप्रावर असणार आहेत. नीरज चोप्रा भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतो. याशिवाय भारतीय हॉकी संघ कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनविरुद्ध खेळणार आहे.
हेही वाचा-
सनथ जयसूर्या 27 वर्षांनंतरही ‘काळ’ बनला, सचिन तेंडुलकरनंतर रोहित शर्माचेही स्वप्न धूळीत
मोठी बातमी! ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याने, विनेश फोगटची कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा..!
“जोपर्यंत मी कर्णधार आहे तोपर्यंत…” पराभवानंतर रोहित शर्मानं दिला खेळाडूंना पाठिंबा