---Advertisement---

Paris Olympics: भारतासाठी आज 7 वे पदक निश्चित होणार? जाणून घ्या दिवसभराचे वेळापत्रक

On: शनिवार, ऑगस्ट 10, 2024 11:02 AM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 आता शेवटच्या टप्यात आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज (10 ऑगस्ट, शनिवार) भारताचा 15 वा दिवस असणार आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या 14 दिवसांत भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. आता 15व्या दिवशी भारत 7 वे पदक जिंकू शकते. कुस्तीमध्ये भारतासाठी सातवे पदक निश्चित केले जाऊ शकते, ज्यामध्ये रितिका ॲक्शन करताना दिसणार आहे.

भारतीय खेळाडू आज फक्त दोनच खेळांमध्ये सहभागी होताना दिसतील. प्रथम आदिती अशोक आणि दीक्षा डागर गोल्फमध्ये दिसणार आहेत. गोल्फची चौथी आणि शेवटची फेरी खेळली जाईल. आतापर्यंत पूर्ण झालेल्या तीन फेऱ्यांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली झालेली नाही. तीन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर आदिती अशोक 40 व्या तर दीक्षा डागर 42व्या स्थानावर आहे. गोल्फची चौथी फेरी (भारतीय वेळेनुसार) दुपारी 12.30 वाजता सुरू होईल.

तर दुसरीकडे भारताची कुस्तीपटू रितिका आज फ्रीस्टाइल 76 किलो महिला कुस्ती स्पर्धेत मैदानात उतरणार आहे. रितिका ही भारतीय कुस्ती संघाची सहावी आणि शेवटची कुस्तीपटू आहे. भारतीय कुस्तीपटू आपल्या मोहिमेला  राऊंड ऑफ 16व्या फेरीपासून सुरुवात करेल. 16व्या राउंडमध्ये रितिकासमोर हंगेरीची बर्नाडेट नागी असणार आहे.

रितिका येथून पुढे गेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकते. 16व्या फेरीनंतर उपांत्यपूर्व आणि नंतर उपांत्य फेरीचे सामने होतील. त्यानंतर शेवटी अंतिम सामना खेळवला जाईल. आता या स्पर्धेत रितिका किती मजल मारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारताला रितिकाकडून आणखी एका पदकाची अपेक्षा आहे.

10 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे वेळापत्रक

गोल्फ
महिला वैयक्तिक स्ट्रोक प्ले, दुपारी 12:30 वाजता
(राऊंड 4)
आदिती अशोक आणि दीक्षा डागर

कुस्ती
महिलांची फ्रीस्टाइल 76 किलो, दुपारी 2.30 वाजता
(राऊंड ऑफ 16, उपांत्यपूर्व सामना)
रितीका हुडा

महिलांची फ्रीस्टाइल 76 किलो, रात्री 9.45 वाजता
(उपांत्य सामना)
पात्रतेवर आधारित

हेही वाचा-

“जिममध्ये रात्रभर जॉगिंग केलं…”, कांस्यपदक सामन्यापूर्वी अमनने चक्क इतके किलो वजन घटवले
वयाच्या 10 व्या वर्षी अनाथ, स्टेडियमच घर! पाहा अमन सेहरावताचा ऑलिम्पिक पदकाचा संघर्षमयी प्रवास
भारताला सहावे पदक मिळवून देणाऱ्या अमन सेहरावतवर प्रेमाचा वर्षाव, पाहा कोण काय म्हणाले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---