पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी शानदार राहिली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला. भारताने एकूण 29 पदके जिंकली. ज्यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक 19 पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. जे की तो पॅरिसमधील पॅरा भारतीय खेळाडूंनी मोठ्या मोडला.
पॅरालिम्पिकच्या मागील दोन स्पर्धेमध्ये भारताने एकूण 48 पदके जिंकली आहेत. तर त्या मागील 11 स्पर्धेमध्ये भारताने केवळ 12 पदके जिंकली होती. गेल्या दोन आवृत्त्यांमधून भारताची खूप सुधारणा आणि बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
पॅरिसपूर्वी, 54 भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला होता, जो त्यावेळी सर्वात मोठा संघ होता. त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ही भारतीय तुकडी मोठी झाली. पॅरिसमध्ये एकूण 84 पॅरा भारतीय खेळाडूंनी भाग घेतला आणि एकाच आवृत्तीत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम करून इतिहास रचला.
View this post on Instagram
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते
1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
5. रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
9. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
10. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)
11. तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)
12. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL4)
13. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन
14. सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)
15. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH6)
16. दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर (T20)
17. मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
18. शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
19. अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
20. सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, पुरुष भालाफेक (F46)
21. सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट (F46)
22. हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्ण पदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
23. धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F51)
24. प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F51)
25. कपिल परमार (जुडो) – कांस्यपदक, पुरुष 60 किलो (जे1)
26. प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T44)
27. होकुटो होतोजे सेमा (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुषांचा शॉट पुट (F57)
28. सिमरन शर्मा (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 200 मीटर (T12)
29. नवदीप सिंग (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F41)
हेही वाचा-
‘संधीचं सोनं झालं’, प्रतिभावान खेळाडूची टीम इंडियामध्ये निवड; एकेकाळी करिअर धोक्यात होतं!
बांगलादेश मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रुतुराजकडे पुन्हा दुर्लक्ष
ENG vs SL: जो रूट घालतोय धुमाकूळ, दिग्गजाला मागे टाकून केला नवा रेकाॅर्ड