पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून शानदार कामगिरी पाहायला मिळत आहे. भारतीय ऍथलेटिक्स एकापाठोपाठ पदके जिंकून टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रम तोडण्याच्या दिशेन धाव घेत आहेत.आता 5 दिवसपूर्ण झाल्यानंतर भारताच्या खात्यात 15 पदके आले आहेत. ज्यामध्ये केवळ 5 व्या दिवशी म्हणजे काल (02 ऑगस्ट) भारताला 8 पदके मिळाली.आता आज (03 सप्टेंबर) म्हणजेच सहाव्या दिवशी भारताला 7 पदके मिळण्याची अपेक्षा आहे.
काही भारतीय खेळाडू पदक सामना/अंतिम सामन्यासाठी मैदानात असतील. तर काही अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्या खेळाद्वारे मैदानात उतरतील. आज देशाला महिला शॉटपुट F3 मध्ये पहिले पदक मिळू शकते. ज्यामध्ये भाग्यश्री जाधव अंतिम फेरीसाठी मैदानात उतरेल. याशिवाय नेमबाजीत अवनी लेखराकडून दुसऱ्या पदकाची अपेक्षा आहे. अवनीसोबतच मोना अग्रवालकडूनही अपेक्षा असतील. इतर अनेक ॲथलेटिक्स खेळ आणि तिरंदाजीमध्ये पदकांची अपेक्षा आहे.
आजचे पॅरिस पॅरालिम्पिकसाठी भारताचे वेळापत्रक
शूटिंग
दुपारी 1:00 वाजता – महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स एसएच1 (पात्रता)- मोना अग्रवाल आणि अवनी लेखरा
पॅरा ऍथलेटिक्स
दुपारी 2:28 वाजता – महिला शॉटपुट F34 फायनल – भाग्यश्री जाधव
पॅरा तिंरदाजी
दुपारी 3.20 वाजता – महिला वैयक्तिक रिकर्व्ह ओपन 1/8 एलिमिनेशन
शूटिंग
संध्याकाळी 7:30 वाजता – महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स SH1 (अंतिम) – मोना अग्रवाल आणि अवनी लेखरा (जर पात्र असल्यास)
पॅरा तिंरदाजी
रात्री 9:21 वाजता – महिला वैयक्तिक रिकर्व्ह खुल्या उपांत्यपूर्व फेरी – पूजा (पात्र असल्यास)
पॅरा तिंरदाजी
रात्री 9.55 वाजता – महिला वैयक्तिक रिकर्व्ह खुल्या उपांत्य फेरी – पूजा (पात्र असल्यास)
पॅरा तिंरदाजी
रात्री 10:27 वाजता – महिला वैयक्तिक रिकर्व्ह खुली कांस्यपदक सामना – पूजा (पात्र असल्यास)
पॅरा ऍथलेटिक्स
रात्री 10:38 वाजता – महिलांची 400 मीटर T20 फायनल – दीप्ती जीवनजी (पात्र असल्यास)
पॅरा तिंरदाजी
रात्री 10:44 वाजता – महिला वैयक्तिक रिकर्व्ह खुला सुवर्णपदक सामना – पूजा (पात्र असल्यास)
पॅरा ऍथलेटिक्स
रात्री 11:50 वाजता – पुरुषांची उंच उडी T63 अंतिम – शरद कुमार, मरियप्पन थांगावेलू आणि शैलेश कुमार
पॅरा ऍथलेटिक्स
रात्री 12:13 वाजता – पुरुष भालाफेक F46 अंतिम – अजितसिंग यादव, रिंकू आणि सुंदरसिंग गुर्जर
हेही वाचा-
पाकिस्तानी दिग्गजाने ‘आऊट ऑफ फॉर्म’ बाबरची केली सेहवागशी तुलना; म्हणाला, “दोघांचं डोकं…”
बांगलादेश मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
भारताच्या खात्यात दुसरं सुवर्णपदक; स्टार बॅडमिंनपटूची कमाल! लवकरच मेडलची बेरीज दुहेरी अंकात?