पहिल्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत परमार ऑल स्टार्स, आरएस कॅनन्स, बॉल ब्रेकर्स, द व्हर्लविंड्स या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुना क्लब स्नूकर हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यात आनंद केरिंग, मुनीझ पूनावाला, अनिश केरिंग यांच्या अफलातून खेळीच्या जोरावर आरएस कॅनन्स संघाने मनप्रीत अँड गौरव जगवार्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
दुसऱ्या सामन्यात परमार ऑल स्टार्स संघाने रॉकेटस् संघाचा 4-1 असा एकतर्फी पराभव केला. परमार ऑल स्टार्स संघाकडून सिद्धार्थ मोदी, दशमेश कालरा, संजय दिडी, सनत परमार, कैवल्य खानपुरे यांनी सुरेख कामगिरी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
आरएस कॅनन्स वि.वि.मनप्रीत अँड गौरव जगवार्स 3-2(15रेड हँडीकॅप स्नूकर एकेरी: राजेश जांदियाल पराभुत वि. आशिष मेहता 71-79; दुहेरी: मिनोद करकरीया/क्रिश आनंद पराभुत वि.गौरव गढोके/प्रणय माळगावकर 83-91; हँडीकॅप बिलियर्ड्स: आनंद केरिंग वि.वि.अरविंद केरींग 200-100; 6रेड हँडीकॅप स्नूकर: मुनीझ पूनावाला वि.वि.हुसेफा ताहेरभोय 54-32, 58-23; ब्लु शूट आऊट: अनिश केरिंग वि.वि.तुषार आसवानी 1-0);
परमार ऑल स्टार्स वि.वि.रॉकेटस् 4-1(15रेड हँडीकॅप स्नूकर एकेरी: नवीन कोचर पराभुत वि.कपिल पंजाबी 30-79; दुहेरी: सिद्धार्थ मोदी/दशमेश कालरा वि.वि.विशाल अरोरा/उदित सांघवी 82-62; हँडीकॅप बिलियर्ड्स: संजय दिडी वि.वि.राहुल बग्गा 200-159; 6रेड हँडीकॅप स्नूकर: सनत परमार वि.वि.विशाल आसवानी 51-35, 49-39; ब्लु शूटआऊट: कैवल्य खानपुरे वि.वि.अभिजीत घानपुरे 2-0).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत आणि पाकिस्तान यांचा आज सामना, दोघांनाही विजय मिळवणे आवश्यकच
INDvsAUS | ‘हा’ फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी ठरेल ‘एक्स-फॅक्टर’, माहेला जयवर्धनेची मोठी प्रतिक्रिया
ठरलं एकदाचं, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाची ‘हीच’ जोडी उतरणार ओपनिंगला!