आयपीएल 2025 पूर्वी गुजरात टायटन्सनं भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याची नवीन सहाय्यक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. पार्थिवनं आपल्या 17 वर्षांच्या शानदार कारकिर्दीत भारतासाठी 25 कसोटी, 38 एकदिवसीय आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. याशिवाय त्याच्याकडे 139 आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे.
39 वर्षीय पार्थिव पटेलनं एक खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये 6 संघांचं प्रतिनिधित्व केलंय. तो 2008 ते 2010 पर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. आयपीएल 2011 मध्ये तो कोची टस्कर्स केरळकडून खेळला. यानंतर तो आयपीएल 2012 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळला. पार्थिव पटेल आयपीएल 2012 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. तो आयपीएल 2015 ते 2017 पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता. याआधी तो आयपीएल 2014 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनही खेळला होता. नंतर आयपीएल 2018 ते 2020 पर्यंत तो पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता.
पार्थिव पटेलनं तीन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2010 मध्ये जेतेपद पटकावलं तेव्हा तो तत्कालीन कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेचा भाग होता. यानंतर जेव्हा मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2015 आणि आयपीएल 2017 मध्ये विजेतेपद पटकावलं, तेव्हा तो संघात खेळत होता.
पार्थिव पटेलनं आयपीएलमधील 139 सामन्यांमध्ये 22.60 ची सरासरी आणि 120.78 च्या स्ट्राईक रेटनं 2848 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतकांचाही समावेश आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज 31व्या क्रमांकावर आहे. त्यान दिग्गज भारतीय अष्टपैलू युवराज सिंग आणि हार्दिक पंड्या, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, कॅरेबियन अष्टपैलू आंद्रे रसेल, स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि इशान किशन यांच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी जगातील नंबर 1 गोलंदाज! जसप्रीत बुमराहचं स्थान कितवं?
अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीत कहर! आयपीएल मेगा लिलावापूर्वी केली आश्चर्यजनक कामगिरी
आयसीसी क्रमवारीत सूर्यकुमार यादवला मोठा फटका; पहिल्या-दुसऱ्या नाही तर या स्थानी घसरण