रविवारी (6 ऑगस्ट) गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडीजमधील दुसरा टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारताचा दोन विकेटने पराभव झाला. अनुभवी यष्टीरक्षक संजू सॅमसन फलंदाजाच्या रुपात खेळला, पण अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात हो अपयशी ठरला होती. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने मोठी प्रतिक्रिया दिली.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्या संजू सॅमसन (Sanju Samson) ७ धावांवर बाद झाला. वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज अकिल हुसेन याने टाकलेल्या एका चेंडूवर यष्टीरक्षक निकोलस पूरन स्टंपिंग करून सॅमसनची विकेट घेतली. यावर पार्थिव पटेल (Parthiv Patel) म्हणाला की, “जेव्हा कधी भारतीय संघ पराभूत होतो, तेव्हा आपण त्यांच्या नकारात्मक गोष्टींवर चर्चा करतो. मर्यादित षटकांच्या या संपूर्ण मालिकेतल फलंदाजांनी अधिक काळ खेळपट्टीवर टिकणे गरजेचे होते. याविषयी चर्चा देखील झालीये, पण अद्याप असे होऊ शकले नाही.”
पार्थिव म्हणाला, “जेव्हाही सॅमसन संघात नसतो, तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलतो. पण आता त्याला मिळालेल्या संधींचा फायदा घेता येत नाहीये. कदाचीत त्याच्यासाठी वेळ निघून जात आहे. सॅमसनला वारंवार बेंचवर बसवून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याबद्दल बरीच चर्चा होत आहे. सॅमसनला खूप संधी मिळत आहेत, खरे सांगायचे तर, तो त्याचा फायदा घेऊ शकत नाही. या टी20 मालिकेत केवळ तिलक वर्मा याने चांगले प्रदर्शन केले आहे.”
वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यात चांगली कामगिरी करता न आल्यामुळे सॅमसनची टी20 फलंदाजीची सरासरी घसरली. त्याने 18 सामन्यात केवळ 18.82 च्या सरासरीने आणि 131.15 च्या स्ट्राईक रेटने 320 धावा केल्या आहेत. सॅमसनने 2015 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु आतापर्यंत त्याला त्याचे स्थान निश्चित करता आले नाही. याआधीही त्याला दोन सामन्यांनंतर वगळण्यात आले होते, परंतू जेव्हा त्याला काही ठिकाणी संधी मिळाली तेव्हा त्याने धावा केल्या नाहीत. 19 सामन्यांच्या 18 डावांतही तो केवळ एकदाच नाबाद परतला आणि केवळ एकदाच अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाला. (parthiv patel claims every time samson is not in the squad we talk about him but he was not well played)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त
दिग्गज अश्विन आणि बुमराहला हार्दिक पंड्याकडून धक्का! मोडीत निघाले मोठे विक्रम