---Advertisement---

भारीच ना! निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी पार्थिवला मिळाली मुंबई इंडियन्सकडून ‘ही’ जबाबदारी

On: गुरूवार, डिसेंबर 10, 2020 9:03 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने बुधवारी (९ डिसेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या या निर्णयाच्या एक दिवसानंतर लगेच मुंबई इंडियन्सकडून त्याच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयपीएलमध्ये सन २०१५ ते २०१७ पर्यंत पार्थिवने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान त्याने ४० सामने खेळताना २३.३५ च्या सरासरीने ९११ धावा केल्या आहेत. ३५ वर्षीय पार्थिव आता मुंबईसोबत काम करणार आहे. तो संघाच्या प्रशिक्षण विभागासोबत काम करणार आहे. त्याच्यावर ‘टॅलेंट स्काउट’ची जबाबदारी असेल. याचा अर्थ असा की, तो युवा खेळाडूंची सेना तयार करेल, ज्यामुळे भविष्यामध्ये संघात दमदार खेळाडूंचा भरणा असेल.

मुंबई इंडियन्स संघाचा मालक आकाश अंबानीने म्हटले की, “पार्थिव आमच्या संघाशी जोडल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. जेव्हा तो क्रिकेट खेळायचा, तेव्हा आम्ही त्याच्या क्रिकेटच्या ज्ञानाचा मुंबई इंडियन्सच्या चांगल्यासाठी वापर केला. मला विश्वास आहे की त्याच्या योगदानामुळे आमची ‘टॅलेंट स्काऊट सिस्टीम’ सुधारेल.”

“विशेषत: त्याच्याकडे क्रिकेटचे खोल ज्ञान आहे. पार्थिवला आमचे विचार आणि आदर्श माहिती आहेत. त्याला चांगलं माहिती आहे की मुंबई इंडियन्स काय आहे आणि आम्ही काय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पार्थिव तुझं आमच्या कुटुंबात स्वागत आहे,” असेही पुढे बोलताना आकाश म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---