टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली आहे. या मालिकेत भारताने ३-०ने विजय मिळवत वेस्ट इंडिजला क्लीन स्विप दिला. त्यानंतर आता सध्या ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी २९ जुलै रोजी पार पडला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिल्यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. याबाबत बोलताना भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने भाष्य केले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग याने काइल मेयर्सला बाद केल्यानंतर त्याला ज्या प्रकारे रोखून पाहिलं त्यावरून मोठी प्रतिक्रिया उमटली आहे. माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलच्या मते, आयपीएलमुळे खेळाडूंमध्ये इतका आत्मविश्वास निर्माण झाला आहे की ते डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात.
Redemption! @arshdeepsinghh has caught everyone by surprise, taking out their key player #KyleMayers.
Watch the India tour of West Indies, only on #FanCode👉https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/Azdfe2a7UM
— FanCode (@FanCode) July 29, 2022
खरंतर, वेस्ट इंडिजचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा काइल मेयर्सने दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगविरुद्ध एक षटकार आणि एक चौकार लगावला. मात्र, यानंतर अर्शदीपने त्याला सुरेख चेंडूवर बाद केले. सेलिब्रेशनदरम्यान अर्शदीप सिंग काइल मेयर्सकडे एकटक पाहत होता. त्यानंतर मेयर्सची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. मेयर्स एकही शब्द न बोलता पॅव्हेलियनकडे शांतपणे चालत निघाला.
दरम्यान, पार्थिव पटेलने अर्शदीप सिंग शिवाय संघात सातत्याने होणाऱ्या बदलांकडेही सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या मते संघात सध्या होत असलेले सर्व बदलांच्या मागे कारण विराट कोहली आहे. प्रामुख्याने विराट कोहली खराब फॉर्ममध्ये असला तरी त्याला संघातून वगळले जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याला संघात सामावून घेण्यासाठी इतर खेळाडूंना योग्य जागी तपासून पाहणे गरजेचे असल्याने हे बदल होत असल्याचे पार्थिव पटेलला वाटते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Commonwealth Games : हरमनप्रीत ते मनिका बत्रा, भारताच्या ‘या’ खेळाडूंनी गाजवला स्पर्धेचा पहिला दिवस
टीम इंडियाचा ‘हा’ स्टार खेळाडू मैदानात उतरण्यासाठी सज्ज, अमित मिश्राने शेअर केली आनंदवार्ता!