ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आधी दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याची पत्नी बेकी कमिन्सनं एका मुलीला जन्म दिला आहे. कमिन्सनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत वडील झाल्याची माहिती दिली. वडील झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधाराने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.
ऑस्ट्रेलियन संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. ज्यामध्ये पॅट कमिन्सचा समावेश नाही. ब्रेक घेतलेला कमिन्स सध्या दुखापतीशी देखील झुंजत आहे ज्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेणार नाही.
कमिन्सने त्याच्या दुसऱ्या मुलाचे म्हणजेच बाळ मुलीचे नाव ‘एडी’ ठेवले आहे. कमिन्सने पत्नी आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले, “आमची गोड मुलगी एडी! हा आनंद आणि प्रेम शब्दात वर्णन करता येणार नाही.”
Pat Cummins and his wife have been blessed with a baby girl and named ‘Edi’.
– Many Congratulations to both of them. ❤️ pic.twitter.com/UqPQxK1oO9
— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 8, 2025
याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये, कमिन्स पहिल्यांदाच वडील झाला. त्यावेळी कमिन्सच्या घरी एका बाळाचा जन्म झाला. त्याचे नाव अल्बी आहे. कमिन्स आणि बेकी लग्नाआधीच पहिल्यांदाच पालक बनले होते. यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्यांचे लग्न झाले.
पॅट कमिन्स 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. कमिन्स दुखापतीमुळे बाहेर होता. सर्व संघ 12 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करू शकतात. अशा परिस्थितीत, आता स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची धुरा कोण सांभाळते हे पाहणे रंजक ठरेल.
कमिन्स ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. आतापर्यंत त्याने 67 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 57 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 294 विकेट्स घेतल्या आहेत तर 1454 धावाही केल्या आहेत. याशिवाय, कमिन्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये 143 विकेट्स घेतल्या आहेत आणि 537 धावा केल्या आहेत. उर्वरित टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कमिन्सने 66 विकेट्स घेतल्या आहेत आणि 158 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
आयपीएल 2025: राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी विभागाला नव्या प्रशिक्षकाची साथ!
Ranji Trophy: अंतिम चारसाठी तीव्र लढत, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला!
सचिनचा विक्रम धोक्यात? कोहलीकडे कटकमध्ये नवा इतिहास रचण्याची संधी!