---Advertisement---

कमिन्स बनला ऑस्ट्रेलियाचा नवा कसोटी कर्णधार; ६५ वर्षानंतर वेगवान गोलंदाजाकडे नेतृत्व

On: शुक्रवार, नोव्हेंबर 26, 2021 8:16 AM
---Advertisement---

गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेला ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेट कर्णधारपदाचा संभ्रम आज मिटला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृतपणे अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आल्याची घोषणा केली. तो ऑस्ट्रेलियाचा ४७ वा कसोटी कर्णधार असेल.

भूतकाळातील अनेक गंभीर घटना समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन याने तडकाफडकी आपल्या नेतृत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पुढील कर्णधार कोण असेल याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) त्यावर पडदा पडला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या निवेदनात पॅट कमिन्स कर्णधार तर, अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला उपकर्णधारपद दिले जात असल्याचे घोषित केले. ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित ऍशेस मालिकेत तो नेतृत्व करेल.

सन १०५६ मध्ये रे लिंडवॉल यांनी एका सामन्यात कर्णधारपद भूषवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पुरुषांच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणारे ते पहिले तज्ञ वेगवान गोलंदाज ठरलेले. मध्यमगती अष्टपैलू खेळाडू मॉन्टी नोबल आणि जॅक रायडर यांनी १९०० च्या दशकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---