टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मधील चौथा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जात आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बांग्लादेशनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 140/8 धावा केल्या.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनं अप्रतिम गोलंदाजी केली. तो 2024 टी20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यानं बांग्लादेशच्या महमुदुल्ला रियाध, मेहंदी हसन आणि तौहीद ह्रिदोय यांची सलग 3 चेंडूवर विकेट घेतली.
यासह पॅट कमिन्स हा टी20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा ब्रेट लीनंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. पॅट कमिन्सची हॅट्ट्रिक अनोखी होती, कारण त्यानं ती दोन षटकांत पूर्ण केली. 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 विश्वचषकात ब्रेट लीनं हॅट्ट्रिक घेतली होती. विशेष म्हणजे त्यानं देखील बांगलादेशविरुद्धच ही कामगिरी केली होती.
टी20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांग्लादेश, केप टाउन, 2007
कर्टिस कॅम्फर (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड्स, अबू धाबी, 2021
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, 2021
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, 2021
कार्तिक मयप्पन (यूएई) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, 2022
जोशुआ लिटल (आयर्लंड) विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, 2022
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांग्लादेश, अँटिग्वा, 2024
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज
ब्रेट ली विरुद्ध बांग्लादेश, केप टाउन, 2007
ॲश्टन आगर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2020
नॅथन एलिस विरुद्ध बांग्लादेश, मीरपूर, 2021
पॅट कमिन्स विरुद्ध बांग्लादेश, अँटिग्वा, 2024
महत्त्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी हाताला काळ्या पट्ट्या का बांधल्या होत्या?
भारताच्या अफगाण विजयाचे 5 नायक, टीम इंडियाच्या या खेळाडूंनी निभावली महत्त्वाची भूमिका
बुमराह-अर्शदीपची धडाकेबाज गोलंदाजी, भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी दमदार विजय!