ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने वनडे क्रिकेटच्या भवितव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपण विश्वचषकापर्यंत खेळणार असून, त्यानंतर वनडे क्रिकेट खेळणार की नाही याबाबत आपण निर्णय घेऊ असे तो म्हणाला.
ऍरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यानंतर कमिन्सने केवळ एकदाच संघाचे नेतृत्व केले. कमिन्स कसोटी सामन्यातही संघाचे नेतृत्व करत आहे.
त्याच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबद्दल विचारले असता, तो म्हणाला,
“खरे सांगायचे तर मी अजून यावर फारसा विचार केलेला नाही. मी या विश्वचषकात खेळेल आणि कामगिरीचे मूल्यांकन करेल. अनेक खेळाडूंनी वनडेमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. स्टीव्ह स्मिथ, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी देखील ही कामगिरी बजावली आहे. तसेच ऍलेक्स कॅरीही तिथे आहे. त्यामुळे विश्वचषकानंतर मी याबाबत विचार करेन. चांगली गोष्ट म्हणजे आमच्याकडे कर्णधारपदाचे पर्याय आहेत. मिचेल मार्श हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण तो टी20 मध्येही संघाचे नेतृत्व करतोय.”
ऑस्ट्रेलियन संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितले की, मिचेल मार्श हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वरिष्ठ खेळाडू आहे. आता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध करण्याची संधी आहे.
नुकतीच मिचेल मार्शची ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळायची असून, त्यासाठी मार्श संघाचे नेतृत्व करेल. तसेच तो ऑस्ट्रेलियाचा पुढील वनडे कर्णधार देखील होण्याची दाट शक्यता आहे.
(Pat Cummins Big Statement On His Retirement After ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
रांचीत हॉन्डा रॅपसॉल घेऊन फिरतोय एमएस धोनी, नवा व्हिडिओ तुफान व्हायरल
IND vs AUS । विश्वचषकापूर्वी कमिन्स करणार मैदानात पुनरागमन, शेवटच्या ऍशेस कसोटीत झालेली दुखापत






