इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या हंगामासाठी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी संघाला बीसीसीआयकडे सोपवण्याचा मंगळवार (15 नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. त्यातच एक मोठी बातमी पुढे आली. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने पुढील आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्वत: च ट्विट करत याची माहिती दिली.
कोलकाता नाईट रायडर्सचा सॅम बिलिंग्ज (Sam Billings) याने आधीच ट्विट करत सांगितले होते की, तो पुढील आयपीएल हंगाम खेळणार नाही. कारण त्याला मोठ्या फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आता त्याच्यानंतर पॅट कमिन्स (Pat Cummins) यानेही आयपीएल 2023 न खेळण्याचा निर्णय घेतल्याने कोलकाताला दोन धक्के बसले आहेत.
कमिन्सने ट्विट करत म्हटले, ‘आयपीएलचा पुढील हंगाम न खेळण्याचा हा मी एक कठीण निर्णय घेतला आहे. कारण पुढील 12 महिने आंतरराष्ट्रीय कसोटी आणि वनडे सामन्यांमुळे वेळापत्रक व्यस्त आहे. त्यामुळे ऍशेस मालिका आणि विश्वचषकाच्या आधी थोडी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.’
‘मला समजून घेण्यासाठी केकेआरचे खूप धन्यवाद. उत्तम खेळाडूंचा संघ आणि स्टाफ असलेल्या या संघाशी मी लवकरच जुळण्याचा प्रयत्न करेल,’ असेही पुढे त्याने ट्विटमध्ये म्हटले.
I’ve made the difficult decision to miss next years IPL. The international schedule is packed with Tests and ODI’s for the next 12 months, so will take some rest ahead of an Ashes series and World Cup. pic.twitter.com/Iu0dF73zOW
— Pat Cummins (@patcummins30) November 14, 2022
कमिन्सला आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने रिटेन केले नव्हते. यासाठी त्याला फ्रॅंचायजीने लिलावात 7.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तेव्हा तो दुखापतीमुळे केवळ 5 सामने खेळू शकला. यामध्ये त्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने फलंदाजीही केली होती.
कमिन्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले होते. त्याचबरोबर त्याने लीगच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाची बरोबरी केली होती.
ऑस्ट्रेलियाला पुढील वर्षीच्या जून महिन्यात ऍशेस मालिका खेळायची आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. तसेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. कारण संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून त्यांना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे.
कमिन्सची नुकतीच ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यातच सर्व प्रकारच्या क्रिकेटचा खेळाडू असल्याने त्याच्यावर जबाबदारीही अधिक आहे. यामुळेच त्याने आयपीएल 2023मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. Pat Cummins & Sam Billings takes a decision not to play IPL 2023 season
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तयार व्हा! आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये ‘या’ चॅम्पियन खेळाडूचा होणार लिलाव
भारताविरुद्धच्या टी20-वनडे मालिकांसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; दोन दिग्गजांना वगळले, तर नेतृत्वाची कमान…