कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळणाऱ्या पॅट कमिन्सने फलंदाजी करताना धुमाकूळ घातला. त्याच्या शानदारी अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता संघाने पूर्ण ४ षटके शिल्लक ठेवत मुंबईने दिलेले धावांचे आव्हान पूर्ण केले. अशाप्रकारे कमिन्सच्या शानदार फटकेबाजीमुळे कोलकाता संघाने हा सामना ५ विकेट्सने आपल्या खिशात घातला. या हंगामात खेळलेल्या ४ सामन्यांतील कोलकाताचा हा तिसरा विजय होता. विशेष म्हणजे कमिन्सने या सामन्यात वेगवान अर्धशतक करत खास विक्रम नोंदवला. (Pat Cummins Hit Joint Fastest Fifty In IPL History)
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्स गमावत १६१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोलकाताने पावरप्लेमध्येच आपले २ विकेट्स गमावले होते. मात्र, वेंकटेश अय्यरने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने ५० धावांचे योगदान दिले. पुढे सॅम बिलिंग्स (१७), नितीश राणा (८) आणि आंद्रे रसेल (११) हेदेखील नियमित अंतराने बाद झाले. मात्र, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पॅट कमिन्सने (Pat Cummins) संघाला विजय मिळवून देण्याचा जणू विडाच उचलला.
त्याने वेंकटेश अय्यरला साथ देत दुसऱ्या बाजूने किल्ला लढवला. त्याने अवघ्या अफलातून फटकेबाजी करत अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक ठोकले. पुढच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकत विजय मिळवला आणि १५ चेंडूत ५६ धावा केल्या. यावेळी त्याने ४ चौकार आणि ६ षटकारांचा पाऊस पाडला. मुंबईच्या डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर १६व्या षटकात ३५ धावा आल्या. यातील ३२ धावा एकट्या कमिन्सच्या होत्या.
WE CANNOT BELIEVE WHAT WE WITNESSED! 🤯
Joint-fastest fifty in the IPL history! 🔥@patcummins30 #KKRHaiTaiyaar #KKRvMI #IPL2022 pic.twitter.com/URKE1idefz
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2022
या अर्धशतकासह कमिन्सने खास विक्रम केला. त्याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या केएल राहुलच्या (KL Rahul) विक्रमाची बरोबरी केली. राहुलनेही १४ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. राहुलने हे अर्धशतक २०१८ साली दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध (आताची दिल्ली कॅपिटल्स) खेळताना ठोकले होते. या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या युसूफ पठाण आणि सुनील नारायण या खेळाडूंचा क्रमांक लागतो. कोलकाताच्या युसूफने २०१४ साली सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तसेच, कोलकाताच्याच नारायणने २०१७ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना १५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे खेळाडू
१४ चेंडू- केएल राहुल (विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०२२)
१४ चेंडू- पॅट कमिन्स (विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स, २०१८)*
१५ चेंडू- युसूफ पठाण (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१४)
१५ चेंडू- सुनील नारायण (विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०१७)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
MI vs KKR | मुंबईची पराभवाची हॅट्रिक, कमिन्सच्या विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय
दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! ‘हे’ दोन खेळाडू संघात आल्याने मिटणार फलंदाजी अन् गोलंदाजीची कटकट
KKR vs MI | नाणेफेक जिंकत श्रेयसचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दोन नव्या बदलांसह दोन्ही संघ सज्ज