2021 टी20 विश्वचषकाचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा संघ बार्बाडोसला पोहोचला आहे. तेथे त्यांना 2024 टी20 विश्वचषकातील पहिला सामना खेळायचा आहे. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल आयपीएल 2024 चे प्लेऑफ सामने खेळून ऑस्ट्रेलियाला परतले होते. तेथून ते आता वेस्ट इंडिजला पोहोचले आहेत. मात्र, दरम्यान, ऑस्ट्रेलियन कॅम्पमधून पॅट कमिन्सचं सामान चोरीला गेल्याची बातमी आली आहे.
ऑस्ट्रेलिया बुधवारी टी20 विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. कांगारुंचा पहिला सामना ओमानशी होईल. cricket.com.au च्या रिपोर्टनुसार, पॅट कमिन्सनं सिडनी आणि कॅरिबियन दरम्यान दोन दिवस प्रवास केला. त्याची पत्नी बेकीनं सांगितलं की, त्यांचं काही सामानही वाटेत हरवलं होतं. मात्र नंतर त्यांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू सापडल्या.
दुसरीकडे, अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात खेळू शकला नाही, कारण त्याची क्रिकेट किट त्रिनिदादपर्यंत पोहोचू शकली नाही. त्याच वेळी, ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल स्टार्कच्या फ्लाइटला उशीर झाला, ज्यामुळे ते बार्बाडोसला उशिरा पोहोचले. असं एक-दोन नव्हे, तर अनेक क्रिकेटपटूंसोबत घडलं आहे. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगानंही याबाबत निराशा व्यक्त केली होती. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडच्या अनेक खेळाडूंनी सामानाबाबत तक्रारी केल्या आहेत.
आयसीसीची ही पहिलीच स्पर्धा असेल जिथे खेळाडूंना इतक्या समस्यांचा सामना करावा लागतोय. न्यूयॉर्कमध्ये बांधलेल्या नवीन स्टेडियममध्ये भारतीय खेळाडूंच्या किट बॅग बाहेर ठेवण्यात आल्यानं आयसीसीलाही लक्ष्य केलं जात आहे. याबाबत बोर्डानं तक्रारही केली होती, ज्यानंतर प्रकरण लवकरच मिटलं. याशिवाय भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही खेळपट्टी आणि मैदानावर नाराज होते.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना, चर्चा मात्र हार्दिक पांड्याची! नेमकं काय घडलं जाणून घ्या
झोपडपट्टीत दिवस काढले, प्यायला शुद्ध पाणी नव्हतं; युगांडाचा हा क्रिकेटपटू आता विश्वचषकात आपला जलवा दाखवणार!
नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमननं रचला इतिहास! टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज