---Advertisement---

केकेआरला तगडा धक्का! ‘हा’ मॅचविनर खेळाडू खेळणार नाही आयपीएलचा उर्वरित हंगाम

---Advertisement---

अचानकपणे आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता आयपीएलचा उर्वरित भाग संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवला जाणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, उर्वरित हंगामात अनेक विदेशी खेळाडू उपलब्ध राहू शकणार नाहीत. कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार व यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने नुकतेच आपल्या संघातील कोणकोणते खेळाडू उपलब्ध नसलेली याविषयी खुलासा केला आहे.

हा खेळाडू नसेल आयपीएलसाठी उपलब्ध
आयपीएल २०१८ ते आयपीएल २०२० पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केलेला दिनेश कार्तिक याने नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “युएई येथे होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामासाठी पॅट कमिन्स उपलब्ध नसेल. त्याने याबाबत खूप आधीच सांगितले होते आणि आता त्यावर मोहर उठली आहे. स्पर्धा सुरू होण्यास आणखी तीन महिने असून तरी काही गोष्टी बदलू शकतात.”

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा वेगवान गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्स याने आयपीएल २०२१ मध्ये ७ सामने खेळताना आपल्या धारदार गोलंदाजीने ९ गडी बाद केले होते. याशिवाय चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी करत नाबाद अर्धशतक झळकावले.

तर नेतृत्व करण्यास तयार
दिनेश कार्तिकने या मुलाखतीत पुढे बोलताना म्हटले, “संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन यूएईला येणार की नाही याबाबत अजून स्पष्ट बातमी पुढे आलेली नाही. मात्र, तो तेथे न आल्यास संघ व्यवस्थापनाने सांगितल्यास मी नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.” दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाताने आयपीएल २०१८ मध्ये प्ले ऑफपर्यंत धडक मारली होती. मात्र, २०१९ मध्ये संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. आयपीएल २०२० च्या मध्यात त्याने नेतृत्व सोडून मॉर्गनकडे दिले होते.

युएईत होणार आयपीएल
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की आयपीएल २०२१ मधील उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएई येथे खेळविले जातील. प्ले ऑफच्या सामन्यांसह एकूण ३१ सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने अबुधाबी, दुबई व शारजा येथील मैदानांवर होतील. यापूर्वी, युएईमध्ये दोन वेळा आयपीएलचे आयोजन झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी ठेवण्यापासून रोखणारे एरिक हॉलिस, कारकिर्दीत मिळवले तब्बल २३२३ बळी

एकाच खेळीत कॉनवेने रचलेत विक्रमांचे इमले; धवनचा मोठा पराक्रमही जमीनदोस्त

आयसीसीने घातलेली २ वर्षांची बंदी पूर्ण करुन सनथ जयसुर्या ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्यास सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---