इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा ऍशेस सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. शनिवारी (2 जुलै) रोजी ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना 43 धावांनी जिंकला. लॉर्ड्स कसोटीत जॉनी बेअरस्टो याची विकेट वादाचा मुद्दा ठरली. यष्टीरक्षक एलेक्स केरी याने त्याला स्टिंपिंग करून बाद केले, पण त्यावेळी बेअरस्टो सावध नव्हता, असे म्हणता येईल. बेअरस्टोच्या विकेटविषयी जगभरातील जाणकार वेगवेगळी मते मांडत आहेत. असातच ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स यानीही आपले मत व्यक्त केले.
लॉर्ड्स कसोटीत जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) या नाटकीय पद्धतीने वाद झाला, त्याची चर्चा जगभरात झाली. फलंदाजने क्रिजच्या आतमध्ये पाट टेकवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण यष्टीरक्षक फलंदाजने संधी साधत स्टिंपिंग केली आणि पंचांनी बेअरस्टोला बाद दिले. भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि इतर काही जाणकारांच्या मते बेअरस्टोची विकेट ऑस्ट्रेलियाने अगदी योग्य मार्गाने घेतली आहे. असात त्यांच्यावर टिका होण्याचे कारण नाही. पण ऑस्ट्रेलियन संघाने चुकीच्या पद्धतीने विकेट घेतली, असे मत असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णदार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या मते या विकेटबाबत बोलताना खेळाडू वृत्ती हा मुद्दा मध्ये आणला नाही पाहिजे.
दरम्यान, जॉनी बेअरस्टोच्या वादावर कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कमिन्सच्या मते बेअरस्टोच्या विकेटवर कुठली चर्चा व्याही असे वाटत नाही. कमिन्स म्हणाला, “मला वाटत नाही की, हा वादाचा मुद्दा आहे. सोबतच मला असेही वाटते नाही की, अशा प्रकारे बाद केल्यानंतर खेळाडू वृत्तीची चर्चाच झाली पाहिजे. यात काय चुकीचं होतं? ही फक्त एक स्टिंपिंग होती. यावर कसलाच वाद होणे अपेक्षित नाही.”
दरम्यान, सोशल मीडियावर कमिन्सची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. चाहते आणि नेटकरीही यावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी ऍशेस कसोटीत गुरुवारी (6 जुलै) हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन संघ 0-2 अशा आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात जर पाहुण्या संघाने विजय मिळवला, तर इंग्लंडल्या मायदेशातील मालिकेत लाजिरवाना पराभव स्वीकारावा लागेल. (Pat Cummins reacts to the Jonny Bairstow wicket controversy)
महत्वाच्या बातम्या –
भीषण अपघातानंतर प्रवीण कुमारणे सांगितलं जीव वाचण्याचं कारण! वाचा काय म्हणाला माजी वेगवान गोलंदाज
इंग्लंडच्या फक्त तोंडातच दम! ऍशेस गमावण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या टीमवर संतापला माजी दिग्गज