ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून या दोन संघांमध्ये सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. लाहोर येथे सुरू असलेल्या या मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात पाकिस्तानला २६८ धावांत गुंडाळले. ऑस्ट्रेलियाने २० धावांत पाकिस्तानच्या ७ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावाच्या जोरावर १२३ धावांची आघाडी मिळाली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने (AUS vs PAK) एकही विकेट न गमावता ११ धावा केल्या होत्या. यजमानांना इतक्या कमी धावांवर रोखण्यात पॅट कमिन्सने (Pat Cummins) मोलाचे योगदान दिले. त्याने ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानेही एक आश्चर्यकारक झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ जेव्हा सुरू झाला, तेव्हा पाकिस्तानने जबरदस्त फलंदाजी केली. दुसऱ्या दिवसाचे नाबाद फलंदाज अझर अली आणि अब्दुल्ला शफीक यांनी ८० धावांची भागीदारी केली. नॅथन लायनने शफिकला ८१ धावांवर बाद केले. यानंतर बाबर आझम फलंदाजीला आला आणि अझर अलीने पाकिस्तानचा डाव पुढे नेला. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी सुमारे १५ षटके फलंदाजी केली.
पाकिस्तानच्या डावातील हे ८७ वे षटक होते. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने चेंडू टाकला आणि स्ट्राईकवर असलेल्या अझर अलीने या षटकाचा चौथा चेंडू बॅक टू बॉलर खेळला. त्याला बॅटवर ताबा ठेवता आला नाही. चेंडू काही काळ हवेत होता. यादरम्यान पॅट कमिन्सने स्वत:ला त्याचा आश्चर्यकारक झेल घेतला. कमिन्सने झेल घेतला, तेव्हा माईक हेझमन कॉमेंट्री करत होता. त्याचाही या झेलवर विश्वास बसत नव्हता. अझर अली ७८ धावा करून बाद झाला.
Pat Cummins is perfection – What a catch.pic.twitter.com/5UIzgNwrfr
— Johns. (@CricCrazyJohns) March 23, 2022
हेस्मन समालोचन करताना म्हणाले की, “काय झेल आहे, पॅट कमिन्सने घेतलेला तो खळबळजनक झेल होता, एक उत्तम झेल. असं असलं तरी वेगवान गोलंदाजाला त्याच्या फॉलो थ्रोमध्ये झेल पकडणं अवघड जातं, पण पॅट कमिन्सने ते करून दाखवलं. अझर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कसोटीत पुन्हा आगमन केले.”
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या मालिकेच्या दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कशी असेल आयपीएल २०२२साठी सज्ज असलेल्या मैदानांची खेळपट्टी? ‘या’ ४ मैदानांवर १० संघ करणार धमाल